शहरं
Join us  
Trending Stories
1
GST' नंतर आता सरकार आणखी एक दिलासा देणार! 'ट्रम्प टॅरिफ'च्या टेन्शनमधून व्यावसायिक मुक्त होतील
2
"...का तूच खातो सगळं रेटून? आम्हाला तर माहीत आहे, या जीआरवरच संपूर्ण मराठवाडा बसतो!"; भुजबळांना डीवचत जरांगेंचा दावा!
3
भारत-चीन ट्रम्प यांच्यावर त्यांचंच जाळ फेकणार; 'बाल्ड ईगल'ला झटका बसणार, लवकरच येणार नवी 'पेमेंट सिस्टम'?
4
एअरटेलचा सर्वात महागडा रिचार्ज प्लॅन; एका वर्षासाठी मिळणार अनलिमिटेड बेनिफिट्स, काय-काय आहे?
5
६ दिवसांत 'रॉकेट' बनला सेमीकंटक्टर कंपनीचा शेअर; पंतप्रधान मोदींचा या क्षेत्रावर आहे फोकस
6
“राज-उद्धव ठाकरे बंधूंच्या घट्ट युतीतून मुंबईत मराठी माणूस महापौर होईल”; संजय राऊतांचा दावा
7
हा खरा गणेशोत्सव! परभणीत गणेश मंडळाकडून जोडप्याचे शुभमंगल, संसारोपयोगी साहित्य भेट!
8
लग्नाला सहा महिनेही झाले नव्हते, अचानक एक दिवस पत्नी बेपत्ता, व्हॉट्सअपवर पतीला फोटो आला...
9
Apple च्या भारतातील गुंतवणूकीवर ट्रम्प नाराज; टिम कुक यांना सर्वांसमोर थेट प्रश्न विचारला...
10
Astro Tips: तुमची ग्रहस्थिती 'ही' असेल तर शेअर मार्केटमध्ये होतो लाभ, अन्यथा सुपडा साफ!
11
अरे बापरे! महाराष्ट्रात वाघांनी घेतला २१८ जणांच्या नरडीचा घोट, देशात सर्वाधिक हल्ले राज्यात
12
प्रताप सरनाईकांनी घेतली देशातील पहिली Tesla Model Y कार; नातवाला दिली भेट, म्हणाले...
13
रणबीर कपूरशी संबंधित 'या' कंपनीच्या शेअरमध्ये मोठी तेजी; ब्लॉक डीलनंतर शेअरने गाठले अप्पर सर्किट
14
दिल्लीहून इंदूरला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग, विमानात १६१ प्रवासी होते
15
मुस्लीम, शेतकऱ्यांसाठीही मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करा; मनोज जरांगेंच्या मुख्यमंत्र्यांकडे नवीन मागण्या काय?
16
No Cost EMI: फुकट काहीच नाही, समजून घ्या गणित; खरंच व्याज द्यावं लागत नाही का?
17
Mumbai on Alert: ४०० किलो RDX सह १४ दहशतवादी भारतात घुसले; आत्मघातकी हल्ल्याची धमकी देणारा मुंबई पोलिसांना मेसेज
18
दूध, ब्रेड, पनीर, भाज्या.., त्या २० गोष्टी ज्या तुम्ही दररोज खरेदी करता, GST कपातीनंतर किती होणार स्वस्त?
19
लॉटरी लागली नाही, तरी तिकिटाचे पैसे वाया जाणार नाहीत, सरकार व्याजासह परत देणार; प्रस्ताव विचाराधीन
20
वॉशिंग्टनमधील मराठी कला मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षात १५०० भाविकांच्या उपस्थितीत बाप्पाला निरोप 

उपचारासाठी माजी सैनिक कुटुंबाची फरपट

By admin | Updated: September 11, 2015 02:54 IST

जिल्ह्यातील सुमारे दोन हजार माजी सैनिक कुटुंबांची पॉलिक्लिनिक नसल्याने उपचारासाठी फरपट सुरू आहे.

पॉलिक्लिनिक नाही : विदर्भात एकमेव यवतमाळ वंचित, दोन हजार कुटुंबांना फटका यवतमाळ : जिल्ह्यातील सुमारे दोन हजार माजी सैनिक कुटुंबांची पॉलिक्लिनिक नसल्याने उपचारासाठी फरपट सुरू आहे. विदर्भात केवळ यवतमाळ या सुविधेपासून वंचित आहे. परिणामी या कुटुंबातील लोकांना उपचारासाठी खर्चाचा भार सहन करावा लागत आहे. ही सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी मागील काही वर्षांपासून ‘ईसीएचएस’ (माजी सैनिक अंशदायी स्वास्थ्य योजना समिती) कृती समितीचे प्रयत्न सुरू आहे. मात्र जिल्हा प्रशासनाकडून यात खोडा घातला जात असल्याचा आरोप होत आहे. माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी शासनामार्फत अंशदायी स्वास्थ्य योजना राबविली जाते. यासाठी सेवानिवृत्तीच्या वेळी प्रत्येक माजी सैनिकाकडून १८ हजार रुपये कपात केले जाते. सोबतच पॉलिक्लिनिकमध्ये उपचारासाठी कार्ड देण्यात येते. ही सोयच यवतमाळात नाही. वर्धा-अमरावती-नागपूर आदी ठिकाणी जाऊन याचा लाभ घेतला जाऊ शकतो. मात्र साधारण आजारासाठी प्रवास आणि भाड्याचा खर्च परवडणारा नसल्याने हे कुटुंब स्थानिक डॉक्टरकडूनच औषधोपचार घेतात. पॉलिक्लिनिक असल्यास संंबंधित तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचार घेता येते. यासाठीचा खर्च माजी सैनिक अंशदायी स्वास्थ्य योजनेंतर्गत दिला जातो. येथे पॉलिक्लिनिक मंजूर झाले असले तरी जागा उपलब्ध झाली नाही. मागील चार वर्षांपासून अनेकदा जागा बदलविण्यात आल्या. कायमस्वरूपी जागेसाठी झालेल्या पाठपुराव्यानंतरही हा प्रश्न निकाली काढला गेला नाही. लोकप्रतिनिधींनीही यासंदर्भात संबंधितांना दिशानिर्देश दिले. तरीही प्रश्न कायम आहे. आता ईसीएचएस कृती समितीने संरक्षण मंत्र्यांना निवेदन पाठवून आंदोलनाचा इशारा दिला असल्याचे समितीचे जिल्हा संयोजक अजय पिसाळकर यांनी सांगितले. (वार्ताहर)