शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानगंगा अभयारण्यात रमलेल्या टिपेश्वरच्या 'त्या' वाघासाठी वनविभाग शोधतोय जोडीदार    

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 12:08 IST

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वन्यजीव विभागाअंतर्गत टिपेश्वर अभयारण्यातील टी१सी१ या  नर वाघाने  औरंगाबाद- बुलढाणा जिल्ह्याच्या  सिमेवरील ज्ञानगंगा अभयारण्यात आपले बस्तान   मांडले  आहे. आता तिथे त्याला स्थिरावण्यासाठी जोडीदाराचा शोध वनविभाग घेत आहे.

भास्कर देवकतेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वन्यजीव विभागाअंतर्गत टिपेश्वर अभयारण्यातील टी१सी१ या  नर वाघाने  औरंगाबाद- बुलढाणा जिल्ह्याच्या  सिमेवरील ज्ञानगंगा अभयारण्यात आपले बस्तान   मांडले  आहे. आता तिथे त्याला स्थिरावण्यासाठी जोडीदाराचा शोध वनविभाग घेत आहे. ज्ञानगंगा अभयारण्यात स्थायिक  होण्यापूर्वी या वाघाने  तब्बल तीन हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे. त्याच्या या प्रवासात टिपेश्वर ते तेलंगणाजवळील आदिलाबादच्या जंगलापर्यंत तसेच उमरखेडचे  पैनगंगा अभयारण्य ते औरंगाबादमधील ज्ञानगंगा आणि अजिंठा डोंगरापर्यंतचा प्रवास समाविष्ट आहे.टिपेश्वरच्या आसपास या वाघाने ३६० किलोमीटर, टिपेश्वार ते ज्ञानगंगा १,४७५ किलोमीटर आणि ज्ञानगंगाच्या आसपास १,१५५ किलोमीटरचे अंतर कापल्याने वनाधिकाऱ्यांनी त्याचे वॉकर असे नामकरण केले आहे. वनाधिकाऱ्यांनी त्याला पकडले तेव्हा त्याच्या पोटाजवळ वायरचे जाळे होते. एक महिन्यानंतर त्याच्या तब्येतीत सुधारणा झाली आणि तो व्यवस्थित चालायला लागला. २१ जून २०१९  पर्यंत तो टिपेश्वर, आदिलाबाद आणि पैनगंगा येथे फिरत होता. तदपत्चात पाच डिसेंबरला ज्ञानगंगामध्ये प्रवेश केल्यानंतर त्याठिकाणी तो बराचवेळ होता. आता तो त्याठिकाणीच स्थायिक झाला असून या अभयारण्यातील गाभा क्षेत्रातील ५२ चौरस किलोमीटरचे क्षेत्र त्याने व्यापले आहे.भारतीय वन्यजीव संस्थानचे वैज्ञानिक डॉ. बिलाल हबीब आणि त्यांच्या चमुने सुमारे सहा हजार वेगवेगळ्या ठिकाणचे त्याचे जीपीएस ठिकाण शोधले आहे. या दोन वर्षाच्या त्याच्या प्रवासात कधीही मानव आणि त्याचा संघर्ष घडून आला नाही. जंगलासह महामार्ग, नद्या, शेती अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून त्याचा प्रवास झाला आहे. तो त्याचे नैसर्गिक खाद्य वापरत आहे. कधीही त्याने माणसांवर हल्ला केला नाही. त्याची ही संपूर्ण वाटचाल जोडीदाराच्या शोधात असल्याचे वनाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून ज्ञानगंगातील त्याचा मुक्काम पाहता त्याच्यासाठी जोडीदार त्याठिकाणी सोडावा का? यावर निर्णय घेण्याकरिता वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी तज्ज्ञांची समिती नेमली आहे.

 

 

टॅग्स :Tigerवाघ