शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कारपेटयुक्त फळ विक्रेत्यांवर अन्न व औषधी प्रशासन मेहेरबान

By admin | Updated: June 11, 2014 00:20 IST

यवतमाळ शहरात फळे पिकविण्यासाठी कारपेटचा मोठ्या प्रमाणात आणि खुलेआम वापर सुरू आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक असलेली ही फळे सर्रास बाजारात विकली जात आहे.

यवतमाळ : यवतमाळ शहरात फळे पिकविण्यासाठी कारपेटचा मोठ्या प्रमाणात आणि खुलेआम वापर सुरू आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक असलेली ही फळे सर्रास बाजारात विकली जात आहे. त्यानंतरही गेल्या कित्येक वर्षात अन्न व औषधी प्रशासनाने एकाही फळ विक्रेत्यावर कारवाई केली नाही की फळांची साधी तपासणीही करण्याची तसदी घेतली नाही. यावरून हे प्रशासन या फळ विक्रेत्यांवर मेहेरबान असल्याचे स्पष्ट होते. दरम्यान कारपेट युक्त फळाच्या होलसेल व चिल्लर विक्रेत्यांवर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन ग्राहक संरक्षण संस्थेचे प्रदेशाध्यक्ष मोहनीश सिंगनजुडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी विदर्भ अध्यक्ष सुरेश सिडाम, जिल्हा महासचिव विक्रांत वानखडे, जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ तेलतुंबडे, नाना हर्षे, प्रमोद गट्टावार, समीर भांडेगावकर, रवी ताटू, शाम सोळंकी, अविनाश राठोड, अशोक लुटे आदी उपस्थित होते. राज्यातील विविध बाजारांमध्ये रसायन वापरुन फळ पिकविणारे व विक्रेत्यांविरुद्ध अन्न व औषधी प्रशासनाने यंदाच्या उन्हाळ्यात बेधडक कारवाई केली. विशेषत: आंबा विक्रेत्यांवर पाळत ठेवली गेली. यवतमाळचा अन्न व औषधी प्रशासन विभाग मात्र याला अपवाद ठरला आहे. या विभागाने अशा फळ विक्रेत्यांविरुद्ध गेल्या कित्येक वर्षात एकही कारवाई केली नाही. एवढेच नव्हे तर तपासणी मोहीमही राबविली नाही. यावरून अन्न व औषधी प्रशासनाचे नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या होलसेल फळविक्रेत्यांशी साटेलोटे असल्याचे उघड होते. फळ विक्रेत्यांवर कारवाईसाठी अन्न प्रशासन अधिकाऱ्यांना तक्रारीची आवश्यकता भासते. तक्रारकर्ता असल्याशिवाय हे अधिकारी कारवाईसाठी जाण्याची हिंमत दाखवत नाही. तक्रारकर्त्याला कारवाईसाठी सोबत राहण्याचा आग्रह धरला जातो. त्यामागे ‘आमचे काही नाही, तक्रार आली म्हणून तपासणीसाठी आलो’ असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न असतो. एवढेच नव्हे तर आलेली तक्रार दडपण्यासाठीही रॉयल्टी वाढवून घेतली जाते. हा प्रकार यवतमाळ जिल्ह्यात व शहरात सर्वत्र सर्रास सुरू आहे. ग्राहक संरक्षण संस्थेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर आता काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी अन्न व औषधी प्रशासनाला एवढ्या वर्षात फळ विक्रेत्यावर नेमकी काय कारवाई केली याचा अहवाल मागावा, कारवाई नसल्यास या अधिकाऱ्यांवरच कारवाई करावी, अशी मागणीही ग्राहक संरक्षण संस्थेने केली आहे. (प्रतिनिधी)