शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

ओमप्रकाशच्या लोकेशनसाठी कॉल डिटेल्सवर लक्ष केंद्रित

By admin | Updated: September 20, 2015 00:13 IST

येथील सोनालीच्या खुनप्रकरणात असलेल्या संशयित आरोपीच्या शोधात पोलिसांचे दोन पथक नागपूरमध्ये दाखल झाले आहे.

पोलीस पथक नागपुरात : सोनाली खूनप्रकरण, यवतमाळ : येथील सोनालीच्या खुनप्रकरणात असलेल्या संशयित आरोपीच्या शोधात पोलिसांचे दोन पथक नागपूरमध्ये दाखल झाले आहे. तर आरोपीचा माग काढण्यासाठी पोलिसांनी मोबाईल कॉल डिटेल्सवरून लोकेशन निश्चित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. शुक्रवारी सकाळी भर रस्त्यात एकतर्फी प्रेमातून चाकूने भोसकून विद्यार्थिनीचा खून केल्याची घटना घडली होती. या घटनेने संपूर्ण शहरातच खळबळ उडाली. पोलीस यंत्रणाही तपासात लागली. संशयिताचे नाव आणि मूळ गावचा पत्ता मिळवून त्याचे घर गाठले. नातेवाईकांकडून संशयित आरोपी ओमप्रकाश तेजराज गुजवार याची माहिती मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. खुनाच्या घटनेनंतर आरोपी नेमका पळाला कुठे याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून त्याच्या मोबाईल क्रमांकाचे लोकेशन व कॉल डिटेल्स घेतले जात आहे. लवकरच आरोपी हाती लागेल अशी खात्री तपास अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. सोनालीच्या मृत्यूनंतर शनिवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात आले. दुपारी संतप्त ग्रामस्थांच्या भावना जाणून घेण्यासाठी पालकमंत्री संजय राठोड व आमदार मदन येरावार यांनी शवविच्छेदन गृहाजवळच भेट घेतली. या प्रकरणात सखोल तपास करण्याचे आश्वासन दिले. शिवाय रुग्णालयात अनेक समस्या असून व्हेन्टीलेटर नसल्यामुळे जीव गमवावा लागल्याची माहिती मंत्र्यांना दिली. लोहारा परिसरात मंजूर असलेले पोलीस ठाणे लवकरात लवकर सुरू केले जावे, अशीही मागणी यावेळी सरपंच बबलू देशमुख, संतोष डोईजड, फिरोज पठाण आदींसह ग्रामस्थांनी केली. त्यानंतर सोनालीच्या पार्थिवावर लोहारा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. (कार्यालय प्रतिनिधी)