शहरं
Join us  
Trending Stories
1
कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती 
2
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
3
कॅब कंपन्यांसाठी सरकारचा नवा नियम, पिक अवरमध्ये दुप्पट भाडं आकारू शकणार; बाईक टॅक्सीलाही मंजुरी
4
IND vs ENG: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये होणार 'हे' ४ महत्त्वाचे बदल
5
त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि...
6
पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा
7
Sonam Raghuwanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य?
8
पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा
9
मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल...
10
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
11
डोनाल्ड ट्रम्प यांचं 'One Big Beautiful Bill' सीनेटमध्ये मंजूर; ट्रम्प आणि मस्क यांनी एकमेकांना दिली 'ही' धमकी
12
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
13
Kolkata Case : "पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा
14
HDB Financial IPO Listing: एचडीएफसीच्या 'स्टार'ची बंपर एन्ट्री; लिस्टिंगवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदार मालामाल
15
Guru Purnima 2025: गुरु शोधायला जाऊ नका, तेच आपल्या आयुष्यात येतात; पण कधी? ते जाणून घ्या!
16
ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य; लवकरच भारतासोबत होणार व्यापार करार, किती टक्के शुल्क लादणार?
17
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
18
पाठीमागून आला लाथ मारली, नंतर गर्लफ्रेंडचा चिरला गळा, तरुणाने वडिलांसमोरच घेतला जीव, का केली हत्या?
19
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
20
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!

नोकरीपेक्षा व्यवसायावर भर द्या

By admin | Updated: October 31, 2015 00:22 IST

प्रत्येक समाजातील बांधवाने नोकरीपेक्षा आवडीचा व्यवसाय करावा. त्यातून प्रगती साधावी. काम करण्याची मानसिकता असलीच पाहिजे, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.

संत नगाजी महाराज जयंती : आर्णीत मान्यवरांसह विद्यार्थ्यांचा सत्कार'आर्णी : प्रत्येक समाजातील बांधवाने नोकरीपेक्षा आवडीचा व्यवसाय करावा. त्यातून प्रगती साधावी. काम करण्याची मानसिकता असलीच पाहिजे, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. येथील श्रीसंत नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा शुक्रवारी २९ आॅक्टोबरला पार पडला. त्यावेळी अहीर बोलत होते. आमदार राजू तोडसाम यांनी सभामंडपासाठी दहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन यावेळी केले. माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनीही मत व्यक्त केले. ते म्हणाले, संतांच्या विचारांना मनुष्याचे मन स्थिर राहते. समाजाने शिक्षणाला अधिक महत्त्व द्यावे. मंत्री असताना त्यांनी दहा लाख रुपयांचा निधी दिला होता. त्यातून संत नगाजी महाराज मंदिरासह इतर बांधकाम करण्यात आले. यावेळी समाजातील मान्यवरांसह विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. नगराध्यक्ष आरिज बेग म्हणाले, नगाजी महाराजांनी समाजाला एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला. नगरपरिषदेच्या माध्यमातून शक्य ते सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली. आमदार ख्वाजा बेग म्हणाले, नगाजी महाराजांचा इतिहास फार मोठा आहे. त्यांनी त्यांच्या कार्यातून समाजाला सकारात्मक दिशा दिली. नाभिक समाज तथा महाल संस्थेने रायगडावर जीवा महाले यांच्या पुतळ्याचे निर्माण करावे, अशी मागणी केली आहे. त्या मागणीचा आपण निश्चितच पाठपुरावा करू, असे ते म्हणाले. कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर उद्घाटक होते. अध्यक्ष म्हणून माजी मंत्री शिवाजीराव मोघे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजू तोडसाम, आमदार ख्वाजा बेग, माजी आमदार श्रीकांत मुनगिनवार, नगराध्यक्ष आरिज बेग, माजी नगराध्यक्ष अनिल आडे, सुधाकर चिठ्ठेकर, प्रकाश मादेश्वार, मनोज भुजाडे, सुरेश चिल्लरवार, डॉ.रमेश व्यवहारे, प्रा.निवृत्ती पिस्तुलकर उपस्थित होते. यावेळी नाभिक समाजाच्या महिला तथा पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते. या निमित्ताने विविध स्पर्धा घेण्यात आला. सूत्रसंचालन रेकलवार यांनी, प्रास्ताविक प्रा. निवृत्ती पिस्तुलकर यांनी केले, आभार सुधाकर चिठ्ठेकर यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)