शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

२५० गावांमध्ये फ्लोराईडयुक्त पाणी

By admin | Updated: May 1, 2017 00:15 IST

जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील २५० गावांमधील पिण्याच्या पाण्याचे ४७१ स्त्रोत फ्लोराईडयुक्त आहे.

४७१ स्त्रोत्र :दूषित पाण्याची समस्या कायमच, २२५ ग्रामपंचायतीअंतर्गतची गावे, आरओ मंजूर, पण बसलेच नाही यवतमाळ : जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील २५० गावांमधील पिण्याच्या पाण्याचे ४७१ स्त्रोत फ्लोराईडयुक्त आहे. या गावांमधील नागरिकांना तेच पाणी प्राशन करावे लागत असल्याने त्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यात दोन हजारांवर गावे आहे. तब्बल बाराशे ग्रामपंचायती व गटग्रामपंचायती आहे. या अंतर्गत ही सर्व २५० गावे येतात. विविध गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी उपाययोजना केल्या गेल्या आहे. त्यात कुठे नळयोजना, हातपंप, सौरपंप, तर कुठे सार्वजनिक विहिरींव्दारे पाणी पुरवठा केला जातो. मात्र यातील तब्बल २५० गावांमधील पिण्याच्या पाण्याचे ४७१ स्त्रोत्र फ्लोराईडयुक्त असल्याचे एका पाहणीत आढळून आले. तेथील ग्रामस्थ तेच पाणी प्राशन करीत असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जिल्ह्यातील २५० गावांमधील पाण्याचे ४७१ स्त्रोत्र फ्लोराईडयुक्त असून त्यात १३५ नळयोजना आहेत. या नळांना फ्लोराईडयुक्त पाणी येत आहे. उर्वरित स्त्रोत्रांमध्ये हातपंपाच्या पाण्याचा समावेश आहे. याशिवाय काही विहिरींचासुद्धा समावेश आहे. विशेष म्हणजे अशा परिसरात ५७ टक्के हातपंपांचे पाणी फ्लोराईडयुक्त असल्याचे पाहणीत आढळून आल्याने तेथील ग्रामस्थांच्या आरोग्याची समस्या उभी ठाकली आहे. या पाहणीत दिग्रस तालुक्यातील एकही स्त्रोत्र फ्लोराईडयुक्त नसल्याचे आढळून आले. मात्र याच तालुक्यातील काही गावांत किडणी आजाराचे रूग्ण आहे. (शहर प्रतिनिधी)