शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
4
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
5
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
6
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
7
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
8
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
9
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
10
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
11
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
12
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
13
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
14
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
15
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
16
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
17
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
18
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
19
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
20
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश

राष्ट्रसंत अडाणचा पूर पोहून आले होते बोरगावात

By admin | Updated: April 30, 2016 02:36 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आर्णी तालुक्यात अनेक गावात आले होते. यात जवळा, शेलू (शें), कुऱ्हा, बोरगाव, चिखली,

तुकडोजी महाराज जयंती : १९५४ ची चातुर्मास समाप्ती ठरली संस्मरणीयहरिओम बघेल आर्णी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आर्णी तालुक्यात अनेक गावात आले होते. यात जवळा, शेलू (शें), कुऱ्हा, बोरगाव, चिखली, कवठाबाजार, आर्णी, तळणी, लोणी, पहूर यांचा समावेश आहे. त्यातील बोरगाव (पुंजी) येथील आठवण तर संस्मरणीय ठरली. कारण या गावातील चातुर्मास समाप्तीसाठी राष्ट्रसंत चक्क अडाण नदीचा पूर पोहून आले होते. राष्ट्रसंतांच्या जयंतीनिमित्त त्या आठवणींना हा उजाळा...२९ व ३० सप्टेंबर १९५४ ची ही घटना आहे. ३० सप्टेंबरच्या दिवशी बोरगावमध्ये चातुर्मास समाप्तीसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज उपस्थित राहणार होते. चांदापूर आश्रम ता.घाटंजी व बोरगाव यातील अंतर तीन किलोमीटर आहे. महाराज २८ सप्टेंबरला चांदापूरला आले होते. तेथील गावकऱ्यांनी महाराजांना आणण्यासाठी खास ज्ञानोबाजी भगवंतराव डेहणकर व महादा मडावी यांना रवाना केले होते. घाटंजी येथे दादासाहेब ढगले यांच्याकडे महाराज मुक्कामी होते. त्यानंतर घाटंजी ते चांदापूर हे १५ किलोमीटर अंतर पायी तुडवत आले. पांढुर्णा, मोठा पांढुर्णा या मार्गाने येऊन कुऱ्हाड गावात महाराज थोडावेळ थांबले. कुऱ्हाड व चांदापूर दरम्यान अडाण नदी आहे. अडाण नदीला पूर आलेला होता. नदीच्या पलिकडे चांदापूर, डोंगरगाव, बोरगाव येथील मंडळी महाराजांची वाट पाहात काठावर थांबली होती. त्यावेळी सायंकाळचे ५.३० वाजले होते. अचानक महाराजांनी नदीपलिकडे पोहत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्वत:चा सदरा डोक्याला बांधून धोतराची लंगोट तयार केली आणि पोहायला सज्ज झाले. यावेळी महाराजांसोबत पुरी व बाबाराव यादव हे तबला-पेटीवादक तसेच महादा मडावी व ज्ञानोबाजी डेहणकरही होते. त्यांनीही महाराजांसोबत पोहण्याचा निर्णय घेतला. महाराजांपाठोपाठ त्यांनीही पुरात उडी घेतली. महाराज सरळ रेषेत पोहत काठावर पोहोचले. परंतु सहकारी आले नाही म्हणून काठावरील नागरिकांच्या मनात शंका आली. काही वेळानंतर सहकारीही काठावर पोहोचल्यानंतर साऱ्यांचा जीव भांड्यात पडला. ही बातमी चांदापुरात पोहोचल्यावरही सगळ्यांनी आनंद साजरा केला. दुसऱ्या दिवशी ३० सप्टेंबर १९५४ ला महाराज चांदापूरवरून बोरगावला आले व नियोजित कार्यक्रम पार पडला. संकटाच्या वेळीही न घाबरता आपल्या ध्येयाकडे वाटचाल केली पाहिजे, अशी शिकवणच राष्ट्रसंतांनी प्रत्यक्ष कृतीतून दिली.