शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

उच्चदाब वीज वाहिनीच्या स्पर्शाने फ्लेमिंगोंचा मृत्यू े

By admin | Updated: July 1, 2014 01:42 IST

फ्लेमिंगो पक्ष्याच्या जोडीचा मृत्यू उच्चदाब वाहिनीच्या तारांना स्पर्श होऊन झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले. दुर्मिळ जातीच्या या पक्ष्यांच्या शवविच्छेदनानंतर हिवरी येथील वनपरिक्षेत्र

शिवानंद लोहिया - हिवरीफ्लेमिंगो पक्ष्याच्या जोडीचा मृत्यू उच्चदाब वाहिनीच्या तारांना स्पर्श होऊन झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले. दुर्मिळ जातीच्या या पक्ष्यांच्या शवविच्छेदनानंतर हिवरी येथील वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत रोपवाटिकेत अंत्यसंस्कार करण्यात आले. यवतमाळ-आर्णी मार्गावरील मांगूळ साखर कारखान्यामागील उमेश सूर्यवंशी यांच्या शेतात रविवारी सकाळी ९ वाजता फ्लेमिंगोची जोडी मृतावस्थेत आढळली होती. ही माहिती वनविभागाला देण्यात आली. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या दोनही पक्ष्यांचे मृतदेह ताब्यात घेऊन यवतमाळ येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात आणले. त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. आर.आर. ईसड आणि डॉ. पी.ए.नागापुरे यांनी शवविच्छेदन केले. शवविच्छेदन अहवालात दोनही पक्ष्यांना विजेचा जबर धक्का बसल्याचे पुढे आले. ज्या शेतात फ्लेमिंगोची जोडी मृतावस्थेत आढळली, तेथून उच्चदाब वाहिनीच्या तारा गेल्या आहेत. या तारांचा स्पर्श झाल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या पाऊस नसल्याने दमट वातावरण आहे. तसेच उकाडाही प्रचंड आहे. अशा स्थितीत फ्लेमिंगोची जोडी प्रवासाने थकली असावी आणि हिरवे शेत दिसल्याने त्या ठिकाणी पाण्याच्या शोधात उतरत असताना विजेचा धक्का लागला असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. हा पक्षी जमिनीपासून साधारणत: २५० मीटर उंचावरून उडतो. हिरवे शेत दिसल्याने तो आकृष्ट झाले. फ्लेमिंगो पक्षावर वनविभागाच्या रोपवाटिकेत सोमवारी दहन करण्यात आले. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी एम.एच. मोहिते, वनपाल जी.के. तिडके, वन कामगार मिर्झा, विजय धांदे उपस्थित होते. दुर्मिळ आणि देखण्या पक्षाच्या अकाली मृत्यूने विभागात हळहळ व्यक्त होत आहे. देखणा फ्लेमिंगोफ्लेमिंगो हा अतिशय देखणा पक्षी आहे. जगात या पक्ष्याच्या सहा जाती आहेत. त्यातील दोन जाती भारतात आढळतात. ग्रेटर फ्लेमिंगो आणि लेसर फ्लेमिंगो या दोन जाती आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टी आणि गुजरातच्या कच्छ भागात हे परदेशी पाहुणे विणीच्या काळात येतात. तेथून ते भारतभर भ्रमण करतात. लेसर फ्लेमिंगो हा दीड ते तीन किलो वजनाचा असतो. तर त्याची उंची ९५ ते १०० सेमी असते. ग्रेटर फ्लेमिंगो हा त्या पेक्षा थोडा मोठा आणि वजनाने अधिक असतो. या पक्ष्याचा रंग पांढरा असून पंख आणि पाय गुलाबी असतात. चोचीवरही गुलाबी छटा असतात. चोच वैशिष्ट्यपूर्ण असून चिखलात भक्ष शोधण्यासाठी तिचा उपयोग होतो. विशेष म्हणजे नर आणि मादी दिसायला सारखीच असते. आयुष्यभरासाठी ते जोडी जमवितात आणि एका वेळी दोन ते तीन अंडी देतात. लेसर फ्लेमिंगो हा विशिष्ट भागात सर्वाधिक आढळतो. तर ग्रेटर फ्लेमिंगो हा सगळीकडे आढळतो. परंतु कमी संख्येत असतो. पाणी आणि दलदलीच्या भागात या पक्षांचे वास्तव्य असते. साधारणत: ४० ते ६० वर्ष या पक्ष्याचे आयुष्य असते. मांगुळजवळ आढळलेली फ्लेमिंगोची जोडी साडेतीन ते पाच वर्षाची असावी, असे पक्षी तज्ज्ञ जयंत अत्रे यांनी सांगितले. यवतमाळ जिल्ह्यात फ्लेमिंगोची कुठेही नोंद नाही. त्यामुळे हे दोन पक्षी कोठून आले हे अद्याप स्पष्ट झाले नाही. परंतु दिग्रसनजीकच्या अरुणावती प्रकल्पातील पाण्यावर जात असावे, असे सांगितले जाते.