शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळात आढळला फ्लेमिंगोचा थवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 14:41 IST

यवतमाळरांना या पक्षाची खूप दिवसांपासून प्रतीक्षा होती. अखेर शहराजवळील बेंबळा धरणावर सोमवारी सकाळी फ्लेमिंगोचा थवा आढळला.

ठळक मुद्देजिल्ह्याच्या पक्षीसूचीत महत्त्वाची भर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : देशभरातील पक्षी अभ्यासकांनी ज्याची प्रचंड उत्सुकता आहे, ते फ्लेमिंगो पक्षी चक्क यवतमाळात आढळले. शहरी मुलांची हौस फिटावी म्हणून मुंबई महापालिकेने लाखो रुपये खर्चून फ्लेमिंगोची खास सोय केली. मात्र यवतमाळसारख्या दूरस्थ ठिकाणी हे फ्लेमिंगो स्वमर्जीने आलेत. बेंबळा धरणावर आढळलेल्या फ्लेमिंगोच्या थव्यामुळे जिल्ह्याच्या पक्षीसूचीत महत्त्वाची भर पडली आहे.यवतमाळरांना या पक्षाची खूप दिवसांपासून प्रतीक्षा होती. अखेर शहराजवळील बेंबळा धरणावर सोमवारी सकाळी फ्लेमिंगोचा थवा आढळला. येथील अमोलकचंद महाविद्यालयाचे प्राणीशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रवीण जोशी आणि डॉ. दीपक दाभेरे हे पक्षीनिरीक्षक धरणावर दैनंदिन पक्षीनिरीक्षण करण्यासाठी गेले असता त्यांना गुलाबी पांढऱ्या रंगाच्या ११ फ्लेमिंगो पक्ष्यांचा देखणा थवा आढळला.यवतमाळ जिल्ह्यात फ्लेमिंगो आढळण्याची ही दुसरी वेळ आहे. दोन वर्षांपूर्वी पांढरकवडा शहराजवळील सायखेडा धरणावर त्याची प्रथम नोंद झाली होती. आता बेंबळा धरण हे पक्ष्यांच्या अधिवासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण बनले आहे. सध्या या धरणावर परतीच्या प्रवासावर असलेल्या विदेशी पक्ष्यांची मोठी संख्या आढळत आहे. यामध्ये मोरशराठी, खोनचिखल्या, राखी चिखल्या, कंठेरी पाणभिंगरी, राखी पाणटिवळा, शेरटा, पालासचा कुरव, विविध सुरय अशा अनेक स्थलांतरित पक्ष्यांची गर्दी बेंबळा धरणावर पाहायला मिळत आहे.असा आहे फ्लेमिंगोया पक्ष्याचे नाव मोठा रोहीत आहे. त्याला इंग्रजीमध्ये ग्रेटर फ्लेमिंगो म्हणतात. तर फोनिटोपटेरेस रोसेयस हे त्याचे शास्त्रीय नाव आहे. या पक्ष्याची मान १४० सेंटीमीटर लांबीची आहे. चोच आणि पायही लांबलचक आहेत. काळी कडा असलेले गुलाबी पंख ही ग्रेटर फ्लेमिंगोची खास ओळख आहे.खाऱ्या पाण्याचे तलाव आणि खाजणाच्या जागा, सागरी किनारे या भागात फ्लेमिंगो सहसा आढळतात. पण हा पक्षी जर बेंबळा या गोड्या पाण्याच्या जलाशयावर आढळत असेल तर हा विचार करण्याचा मुद्दा आहे. पाण्यात झालेले बदल यासाठी कारणीभूत आहेत. शिवाय फ्लेमिंगोचे अन्न बेंबळावर मोठ्या प्रमाणात असल्याचे हे सूचक आहे. पक्षी अभ्यासकांनी या धरणाकडे लक्ष देण्याची गरज आहे.- प्रा.डॉ. प्रवीण जोशीपक्षी अभ्यासक, यवतमाळ

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्य