शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

गोळ्या झेलूनही ध्वजारोहणाचा मान नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 22:37 IST

देशाच्या सीमांचे रक्षण करताना शत्रूच्या गोळ्या खायच्या आम्ही. बलिदानानंतर गावाकडे अंतिम संस्कार करताना चार बंदुकीच्या फैरी झाडल्या की झाला आमचा सन्मान. निवृत्तीनंतर साधा ध्वजारोहणाचा मानही आम्हाला मिळत नाही. हा प्रकार किती दिवस चालायचा, असा प्रश्न सेवानिवृत्त लान्स नायक लक्ष्मणराव कानडे यांनी उपस्थित केला आहे.

ठळक मुद्देमाजी सैनिकाची खंत । निवृत्त लान्स नायक लक्ष्मणराव कानडे यांची खदखद

संजय भगत ।लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : देशाच्या सीमांचे रक्षण करताना शत्रूच्या गोळ्या खायच्या आम्ही. बलिदानानंतर गावाकडे अंतिम संस्कार करताना चार बंदुकीच्या फैरी झाडल्या की झाला आमचा सन्मान. निवृत्तीनंतर साधा ध्वजारोहणाचा मानही आम्हाला मिळत नाही. हा प्रकार किती दिवस चालायचा, असा प्रश्न सेवानिवृत्त लान्स नायक लक्ष्मणराव कानडे यांनी उपस्थित केला आहे.१५ आॅगस्टला सर्वत्र स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्या पार्श्वभूमिवर त्यांनी ‘लौकमत’शी संवाद साधला. ते म्हणाले, देशाचा ध्वज उंच राहावा म्हणून सैनिक बलिदान करतात. मात्र जिवंतपणी आमच्या नशिबी नरक यातना येतात. आता सैनिकाच्या सन्मानात बदल झाला पाहिजे, अशी अपेक्षा घेऊन ते अन्य सैनिकांच्या अधिकारासाठी लढत आहे. सैनिकाच्या डोळ्यासमोर केवळ एकच विचार असतो, देशाचे संरक्षण करणे. मृत्यू केव्हा येईल हे सांगता येत नाही. डोळ्यात तेल घालून सीमेचे संरक्षण करताना आधी देश, नंतर कुटुंब हाच विचार मनात असतो. कित्येकदा कुटुंबातील सदस्यांचे छायाचित्र व त्यांची पत्रे खिशात घालूनच पहारा द्यावा लागतो, असे त्यांनी सांगितले.लक्ष्मणराव कानडे रा.मुडाणा यांच्या बालपणीच आई-वडिलांचा मृत्यू झाला. १९६४ मध्ये लक्ष्मणराव कानडेसह ७0 युवक यवतमाळला सैन्य भरतीसाठी गेले. त्या सर्वांची निवड झाली. कानडे यांना मराठा लाईट इन्फंट्री बेळगाव ट्रेनिंग सेंटर येथे पहिली नियुक्ती मिळाली. प्रशिक्षण पूर्ण झाले त्यावेळी बांगलादेशचे युद्ध संपले होते. युद्ध संपल्यामुळे जनतेत जाऊन मुलांना प्रशिक्षण देण्याचे काम त्यांच्यावर सोपविण्यात आले होते. यानंतर त्यांची नियुक्ती लेह-लडाख येथे झाली. तेथे केवळ बर्फ आणि बर्फातच त्यांनी दिवस-रात्र काढली. निवृत्तीनंतर गाव, खेड्यांमध्ये सैनिकाच्या हस्ते साधे ध्वजारोहण केले जात नाही, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.तहसीलमध्ये सैनिकांची माहितीच नाहीमाजी सैनिकांसाठी तालुका तेथे कार्यालयाकरिता जागा उपलब्ध करून दिली पाहिजे, अशी मागणी कानडे यांनी केली. १५ आॅगस्ट आला की आमची छाती भरून येते. मात्र दुर्दैव असे की निवृत्त सैनिकांची माहिती तहसीलमध्ये उपलब्ध नाही. ध्वजारोहणाचे साधे निमंत्रणही मिळत नाही. लान्स नायक लक्ष्मणराव कानडे यांनी निवृत्त सैनिकांच्या विविध समस्या शासन स्तरावर सोडवून घेण्याकरिता ‘जय जवान माजी सैनिक बहुउद्देशीय संस्थे’ची स्थापना केली. संस्थेच्या माध्यमातून माजी सैनिक रामदास वंजारे, संजय राठोड, दत्तराव टेकाळे, प्रयागबाई हिंगाडे, जगदेव हिंगमिरे, राजू कानडे, रंगराव आखरे, नंदाताई अंभोरे अहोरात्र काम करीत आहेत.

टॅग्स :SoldierसैनिकIndependence Dayस्वातंत्र्य दिन