शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

पाच ट्रक सागवान हैदराबादमध्ये पोहोचले

By admin | Updated: October 18, 2015 02:42 IST

एक-दोन नव्हे तर तब्बल पाच ट्रक अवैध सागवान गेल्या काही दिवसात यवतमाळवरून पांढरकवडा मार्गे हैदराबादमध्ये सुरक्षितरीत्या...

आरोपी चालकाची कबुली : चिचबर्डी जंगलात अवैध वृक्षतोड, यवतमाळ आरएफओ संशयाच्या भोवऱ्यातनरेश मानकर पांढरकवडाएक-दोन नव्हे तर तब्बल पाच ट्रक अवैध सागवान गेल्या काही दिवसात यवतमाळवरून पांढरकवडा मार्गे हैदराबादमध्ये सुरक्षितरीत्या पोहोचविले गेल्याची खळबळजनक कबुली अटकेतील आरोपी चालकाने दिली आहे. या कबुलीने वन प्रशासन चांगलेच हादरले. गुरुवारी सायंकाळी पांढरकवडा येथील वन परिक्षेत्र अधिकारी बाबाराव पवार यांनी संशयावरून राष्ट्रीय महामार्गावर एक ट्रक पकडला. त्यातील सागवानावर लावण्यात आलेले हॅमर आणि खोडतोडीमुळे रहदारी पासवर संशय आल्याने त्यांनी हा ट्रक ताब्यात घेतला. त्यातून सुमारे सहा लाखांचे सागवान जप्त करण्यात आले. ट्रक चालक रिजवान खॉ रहीम खॉ व वाहकाला अटक करण्यात आली. त्या दोघांना १८ आॅक्टोबरपर्यंत वन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात यवतमाळ येथील सागवान कंत्राटदार शेख चाँद याला आरोपी बनविण्यात आले असून त्याचा यवतमाळात शोध घेतला जात आहे. शेख चाँद फरार असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. तपासादरम्यान चालक रिजवान याने अनेक गंभीरबाबी उघड केल्या. सूत्रानुसार, रिजवानने वन अधिकाऱ्यांना सांगितले की, आरएफओ पवार यांनी पकडलेला हा सहावा ट्रक होता. यापूर्वी अशाच पद्धतीने बोगस हॅमर व बोगस रहदारी पासच्या सहाय्याने तब्बल पाच ट्रक सागवान हैदराबाद येथे पोहोचविण्यात आले आहे. सागवान पोहोचविण्याची ही नेहमीचीच पद्धत आहे. या ट्रकला आतापर्यंत यवतमाळपासून पिंपळखुटी चेक पोस्टपर्यंत फॉरेस्ट किंवा पोलीस विभागाच्या कोणत्याही यंत्रणेने थांबविलेले नाही. या कबुलीने वन खात्यात खळबळ निर्माण झाली. या प्रकरणी अधिक माहिती अशी की, यवतमाळातील चिचबर्डी, लासीना, वाघापूर, पिंपरी, कीटा या जंगलात गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात सागवान तोड झाली आहे. ही बहुतांश तोड आदिवासींच्या मालकीची जमीन, भोगवटदार -२ अर्थात महसूल जमीन आणि ई-वर्ग जमिनीवरील आहे. फार थोडी तोड ही वन जमिनीवरील असल्याचे सांगितले जाते. या वृक्षतोडी मागे शेख चाँद आणि कंपूच असावी, असा संशय आहे. याच जंगलातील पाच ट्रक माल आंध्रात पोहोचला. या मालावरील हॅमर बोगस आहेत. सागवानाच्या वाहतूक परवान्याची मुदत १५ दिवस असताना गेल्या सहा महिन्यांपासून एकाच रहदारी पासवर तब्बल सहा ट्रक सागवान नेले गेले. त्यातील पाच ट्रक सुखरुप पोहोचले. मात्र सहावा ट्रक पांढरकवड्याचे वन परिक्षेत्र अधिकारी बाबाराव पवार यांच्या सतर्कतेने पकडला गेला. वन विभागाने जप्त केलेला माल आणि चिचबर्डी-लासीना जंगलातील तोड झालेल्या सागवान थुटांची जुळवणी करण्याचा प्रयत्न वन खात्याकडून सुरू आहे. पाच ते सहा ट्रक सागवान वृक्षांची ही तोड यवतमाळचे वन परिक्षेत्र अधिकारी मडावी, वनपाल भोजने आणि वनरक्षक यादव यांच्या कार्यक्षेत्रातील असल्याचे आढळून आले आहे. सागवान तस्कर शेख चाँद आणि वन अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण संबंध सर्वश्रृत आहेत. त्यांच्या संगनमतातूनच ही भली मोठी वृक्षतोड झाली असून त्यातील सागवानही राजरोसपणे आंध्र प्रदेशात पोहोचविले गेले. या वृक्षतोडीने यवतमाळचे एसीएफ, आरएफओ, वनपाल, वनरक्षक अशा सर्वांच्याच प्रामाणिकतेवर आणि कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह लावले जात आहे.