शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
2
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
3
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
4
२ मुख्यमंत्र्यांना अटक करून चर्चेत आलेले ईडीमधील दिग्गज अधिकाऱ्याने अचानक का दिला राजीनामा?
5
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या
6
Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा
7
अलर्ट! चप्पलचीही असते एक्सपायरी डेट; 'ही' लक्षणं दिसताच ताबडतोब बदला अन्यथा होईल पश्चाताप
8
Lunchbox recipe: मुलं पालकाची भाजी खात नाहीत? डब्यात द्या टेस्टी पालक पुडला; दोनाऐवजी चार खातील
9
धक्कादायक! ठाण्यात रेल्वे प्लॅटफॉर्मवर महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच मालगाडीसमोर ढकललं
10
ऋतुराज गायकवाडनं चांगली संधी गमावली! आयत्या वेळी इंग्लंडला न जाण्याचा निर्णय घेत संघाला दिला धक्का
11
मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती
12
'अशी ही बनवाबनवी'चं शूटिंग झालेलं या ठिकाणी, लीलाबाई काळभोर यांचा बंगला आहे तरी कुठे?, जाणून घ्या
13
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
14
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
15
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
16
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
17
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
18
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
19
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
20
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

यवतमाळात पाच क्ंिवटल कॅरिबॅग जप्त

By admin | Updated: September 11, 2015 02:52 IST

प्लास्टिक निर्मूलन मोहिमेअंतर्गत नगर परिषदेने धाड सत्र सुरू केले असून गुरुवारी खुद्द नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांनी धाड टाकून तीन दिवसात...

नगरपरिषद : तीन दिवसात २५ हजारांचा दंड यवतमाळ : प्लास्टिक निर्मूलन मोहिमेअंतर्गत नगर परिषदेने धाड सत्र सुरू केले असून गुरुवारी खुद्द नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांनी धाड टाकून तीन दिवसात तब्बल पाच क्ंिवटल कॅरिबॅग साठा जप्त केला. तसेच २५ हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. मुख्य बाजारपेठेतील हरिओम प्लास्टिक आणि ओम प्लास्टिक येथे नगर परिषद मुख्याधिकारी सुदाम धुपे यांनी धाड मारली. त्यावेळी या दुकानात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या आढळून आल्या. या सर्व कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या. तसेच बुधवारी सायंकाळी ७.३० वाजता कार्यालयीन साहित्य खरेदीसाठी मेनलाईनमधील एका प्रतिष्ठित बुक्स व जनरल स्टोअर्समध्ये गेले मुख्याधिकारी धुपे गेले होते. तेथे त्यांनी साहित्य खरेदी केली. त्यावेळी त्यांना दुकान मालकाने कॅरिबॅग काढून दिली. त्यानंतर धुपे यांनी तेथील सुमारे तीन किलो कॅरिबॅग जप्त केल्या. दुकान मालकाला पाच हजारांचा दंडही ठोठावला गेला. तसेच शहरातील इतर ठिकाणीही धाडी टाकल्या जात आहे. खुद्द मुख्याधिकारी रस्त्यावर उतरुन धाडी टाकत असल्याने प्लास्टिक पिशवीचा वापर आणि विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. सर्वांच्या आरोग्यास घातक ठरणाऱ्या प्लास्टिक कॅरिबॅगचा वापर करू नये असे आवाहन मुख्याधिकारी सुदाम धुपे यांनी नागरिकांना केले. तसेच अवैधरीत्या प्लास्टिक पिशव्या विक्री करणाऱ्यांची माहिती नगर परिषदेला द्यावी, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.या धाड सत्रात नगर परिषद अभियंता रावसाहेब पालकर, मोहन जोशी, डॉ. विजय अग्रवाल, पाणी पुरवठा अभियंता जाधव, आरोग्य अभियंता अंकिता इसळ, बाजार विभाग प्रमुख सतीश मसराम, आरोग्य निरीक्षक प्रफुल्ल जनबंधू, राहुल पळसकर, परतेती यांच्यासह अनेक कर्मचारी सहभागी झाले होते. (कार्यालय प्रतिनिधी)