शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

पाच नगरपरिषदांना सीओच नाहीत

By admin | Updated: June 5, 2014 00:01 IST

मुख्याधिकार्‍यांसह इतर विभागातील रिक्त पदांमुळे यवतमाळ जिल्ह्यातील दहाही नगरपालिकांचे कामकाज सध्या ठप्प झाले आहे. तीन नगरपालिकेला मुख्याधिकारी नाही तर दोन ठिकाणचे मुख्याधिकारी रजेवर गेले आहे.

कारभार ढेपाळला : रिक्त पदांचे ग्रहण मुकेश इंगोले - दारव्हामुख्याधिकार्‍यांसह इतर विभागातील रिक्त पदांमुळे यवतमाळ जिल्ह्यातील दहाही नगरपालिकांचे कामकाज सध्या ठप्प झाले आहे. तीन नगरपालिकेला मुख्याधिकारी नाही तर दोन ठिकाणचे मुख्याधिकारी रजेवर गेले आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर कामकाजासोबतच शहरातील स्वच्छतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील मोठय़ा नगरपालिका असणार्‍या वणी, पुसद व उमरखेड या ठिकाणच्या मुख्याधिकार्‍यांचे पद रिक्त आहे. तर दारव्हा व नेर येथील मुख्याधिकारी दीर्घ सुटीवर गेले आहे. या प्रमुख अधिकार्‍यांसह बर्‍याच ठिकाणी इतरही कर्मचार्‍यांची पदे रिक्त आहेत. त्याच बरोबर अग्नीशमन दलाची यंत्रणाही कर्मचार्‍यांविना आहे. कार्यक्षेत्रातील नागरिकांना रस्ते, पथदिवे, पाणी व साफसफाई या मूलभूत सुविधा पुरविण्यासोबतच शहराच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी नगरपालिकेमध्ये मुख्याधिकार्‍याचे पद अतिमहत्वाचे आहे. त्यांच्या माध्यमातूनच विकास कामाला गती देण्यात येते. मात्र अनेक नगरपालिकांना मुख्याधिकारीच नसल्यामुळे नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. यवतमाळनंतर जिल्ह्यात वणी व पुसद ही मोठी शहरे आहेत. मात्र त्या ठिकाणच्या नगरपालिकेला मुख्याधिकारी नाही. उमरखेडमध्येसुद्धा मुख्याधिकार्‍याचे पद रिक्त आहे. दारव्ह्याचे मुख्याधिकारी अतुल पंत व नेरचे मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर रजेवर गेले आहे. तब्बल पाच मोठय़ा नगरपालिकांना मुख्याधिकारी नसल्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. या ठिकाणचे प्रभार इतर मुख्याधिकार्‍यांकडे देण्यात आले. मात्र त्यांचा वेळ येण्या-जाण्यात जात असल्यामुळे दोनही ठिकाणच्या कामकाजावर त्याचा विपरित परिणाम होत आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर मुख्याधिकार्‍यांची पदे रिक्त असल्यामुळे साफसफाईंच्या कामाच्या नियोजनात अडथळा निर्माण झाला आहे.  मुख्याधिकार्‍यांप्रमाणेच काही नगरपालिकांमध्ये बांधकाम, पाणीपुरवठा या महत्त्वपूर्ण विभागाच्या अभियंत्यांची तसेच आरोग्य निरीक्षकाचे पदसुद्धा रिक्त आहे. अनेक नगरपरिषदांमध्ये अग्निशमन यंत्रणा आहे. परंतु या विभागातील कर्मचार्‍यांची भरतीच न झाल्यामुळे या विभागाचे कामकाज ठप्प झाले आहे.