शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

नारिंगेनगरात पाच लाखांची घरफोडी

By admin | Updated: November 1, 2014 01:11 IST

देवदर्शनासाठी कुटुंबासमावेत गेलेल्याचे घर फोडून चोरट्यांनी हिरेजडीत सोन्याच्या अंगठ्यांसह अज्ञात चोरट्याने सुमारे पाच लाखांचा ऐवज लंपास केला.

यवतमाळ : देवदर्शनासाठी कुटुंबासमावेत गेलेल्याचे घर फोडून चोरट्यांनी हिरेजडीत सोन्याच्या अंगठ्यांसह अज्ञात चोरट्याने सुमारे पाच लाखांचा ऐवज लंपास केला. त्यामध्ये ९० गॅ्रम सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. घरफोडीची ही घटना येथील नारिंगे नगरात गुरूवारी रात्री घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. यवतमाळ येथील नारिंगेनगरात शालीन प्रवीण शुक्ला यांचे घर आहे. दिवाळी सुट्या असल्याने ते परिवारासह शेगाव येथे गजानन महाराजांच्या दर्शनासाठी गेले. त्यामुळे त्यांच्या घराला कुलूप होते. देवदर्शन आटोपून रात्री १२ वाजताच्या सुमारास ते परिवारासोबत घरी परतले. यावेळी त्यांना घराच्या दाराचा कुलूप कोंडा तुटलेला दिसला. त्यामुळे त्यांनी तत्काळ घराची पाहणी केली. त्यामध्ये कपाटातील दोन हिरेजडीत सोन्याच्या अंगठ्या, ३५ ग्रॅम वजनाचे तीन सोन्याचे मंगळसूत्र, २५ ग्रॅम वजनाच्या बांगड्या, १० ग्रॅम सोन्याची साखळी आणि २५ ग्रॅम लॉकेट असा एकूण पाच लाख रूपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. शुक्ला यांनी तत्काळ घटनेची माहिती शहर पोलिसांना दिली. त्यावरून पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घराची बारकाईने पाहणी केली. तसेच वरिष्ठांना माहिती देऊन पोलीस श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले. मात्र श्वानाला स्मेल देताच ते काही अंतर चालून घुटमळले. ठसे तज्ज्ञांच्या पाहणीतही फारसे काही निष्पन्न झाले नाही. घटनेनंतर पोलिसांनी शालीन शुक्ला यांच्याकडून रितसर तक्रार घेतली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील कुलूप बंद घरे चोरट्यांच्या निशाण्यावर आहे. सध्या दिवाळीच्या सुट्या असल्याने अनेक कुटुंब बाहेरगावी गेले आहेत. त्यामुळे घराला कुलूप आहे. या संधीचा फायदा चोरटे घेत आहे. अनेक भागात लहान मोठ्या चोऱ्या होत आहे. अनेक जण तर लहान सहान चोरीची तक्रारही द्यायला पुढे येत नाही. शहरात वाढत्या चोऱ्या होत असल्या तरी पोलीस मात्र चोरट्यांना पकडण्यात अद्याप यशस्वी झाले नाही.