शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्यभर जमविलेले पाच लाख गरिबांच्या लेकीबाळींसाठी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 01:03 IST

नगरपालिकेत कष्ट उपसताना पगार फार नाही. तरी पोटाला चिमटा घेत आयुष्यभर पै-पै गोळा केली. निवृत्त झाले तेव्हा वृद्ध दाम्पत्याची जमापुंजी भरली पाच लाख रूपये.

ठळक मुद्देपाच लाखांची रक्कम त्यांनी बारी पंचायत फंड बडनेरा यांना देणगी म्हणून दिली

किशोर वंजारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनेर : नगरपालिकेत कष्ट उपसताना पगार फार नाही. तरी पोटाला चिमटा घेत आयुष्यभर पै-पै गोळा केली. निवृत्त झाले तेव्हा वृद्ध दाम्पत्याची जमापुंजी भरली पाच लाख रूपये. उर्वरित आयुष्य सुखात घालविण्यासाठी पुरेसे होते. पण त्यांनी उतारवयातही इतरांच्या लेकीबाळींचा विचार केला. पाचही लाख गोरगरिबांच्या लेकीचे संसार उजविण्यासाठी त्यांनी दान करून टाकले. मधुकरराव लांडोळे आणि प्रयागबाई लांडोळे यांची ही दानत सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.नेर येथील न्यू इंग्लिश हायस्कूलचे प्राध्यापक मनोज दुधे यांचे काका मधुकरराव संवेदनशील स्वभावामुळ सर्वपरिचित आहेत. ते अमरावती महापालिकेत कार्यरत होते. तुटपुंज्या वेतनातही मधुकरराव लांडोळे आणि प्रयागबाई यांनी सुखाचा संसार करून दाखविला. त्यांच्या पोटी जन्मलेल्या दोन मुलांना लहानपणापासूनच स्वावलंबनाचे धडे दिले. तरुणवयात त्यांना चहा कॅफेसारखे छोटे व्यवसाय सुरू करून दिले. आज तेही आपल्या मेहनतीच्या कमाईत खूश आहेत.मधुकरराव लांडोळे यांनी आयुष्यभर गोळा केलेल्या पाच लाखांच्या कमाईतून गरिबांना दिलासा देण्याचा विचार केला. गरिबांच्या लेकींचे लग्न हुंड्यासाठी, लग्नातील खर्चासाठी अनेकदा अडते. वधुपित्याला मानहानीही सोसावी लागते. त्यामुळे मधुकररावांनी या लेकीबाळींसाठीच आपली कमाई दान केली. ही पाच लाखांची रक्कम त्यांनी बारी पंचायत फंड बडनेरा यांना देणगी म्हणून दिली आहे. इतरांच्या लेकींना सुख आणि स्वत:च्या मुलांना स्वावलंबन देणारे मधुकरराव आणि प्रयागबाई यांचे कौतुक होत आहे.