शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

पाच कीटकनाशकांवर पश्चिम विदर्भात ६० दिवस बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 10:07 IST

कीटकनाशक फवारणीतील शेतकरी मृत्यूची दखल घेत प्रधान कृषी सचिवांनी पश्चिम विदर्भात पाच प्रकारच्या कीटकनाशक संमिश्रणांवर पुढील ६० दिवसांसाठी विक्रीवर बंदी घातली आहे.

ठळक मुद्देप्रधान कृषी सचिवांचे आदेश जारीकीटकनाशक परवाने आता एसएओकडे

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : कीटकनाशक फवारणीतील शेतकरी मृत्यूची दखल घेत प्रधान कृषी सचिवांनी पश्चिम विदर्भात पाच प्रकारच्या कीटकनाशक संमिश्रणांवर पुढील ६० दिवसांसाठी विक्रीवर बंदी घातली आहे.प्रधान कृषी सचिव विजय कुमार यांनी हे आदेश जारी केले आहेत. अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पाच प्रकारच्या कीटकनाशक विक्रीला मनाई करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रोफेनोफोस, फीप्रोनील, अ‍ॅसिफेट, डिफेन्थीरोन आणि मोनोक्रोटोफॉस या संमिश्रणांचा समावेश आहे. या आदेशात नमूद केले की, यवतमाळ जिल्ह्यात उपरोक्त विक्रीबंदी केलेल्या कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला. त्यामुळे विषबाधा होऊन १८ शेतकरी-शेतमजुरांना जीव गमवावा लागला. ही कीटकनाशके आत्यंतीक विषारी आहे. त्याचा अनधिकृतरीतीने संमिश्रणासाठी वापर करण्यात येत असल्यामुळे त्याची अत्यंत विषारी बाधा होते. उपरोक्त गटातील कीटकनाशकांचा वापर किंवा मिश्रण मनुष्य जातीस किंवा प्राण्यांना धोकादायक ठरू शकते. कीटकनाशकांची विक्री, वितरण आणि वापर याचा घातक परिणाम लक्षात घेता त्याच्यावर राज्यात यापुढे कायम बंदी चालू ठेवण्याची आवश्यकता असल्याचे शासनाचे मत आहे. त्यामुळेच या कीटकनाशकांना पुढील ६० दिवस अर्थात दोन महिने पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यात विक्री व वापरास बंदी घालण्यात आली असल्याचे नमूद करण्यात आले आहे.कीटकनाशक परवाने आता ‘एसएओ’कडेसद्यस्थितीत खते, बियाणे व कीटकनाशकांच्या विक्री, साठ्याचे परवान्याचे अधिकार जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्यांकडे (एडीओ) आहेत. परंतु यवतमाळातील कीटकनाशक बळी प्रकरणानंतर आता कीटकनाशक विक्री व साठ्याचे परवान्याचे अधिकार ‘एडीओ’कडून काढून घेऊन शासनाच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे (एसएओ) सोपविण्यात आले आहे. २४ नोव्हेंबर रोजी प्रधान कृषी सचिव विजय कुमार यांनी या संबंधीची अधिसूचना जारी केली आहे. बियाणे व खताचे परवान्याचे अधिकार अजून तरी ‘एडीओ’कडे कायम आहेत.

टॅग्स :agricultureशेती