शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

चारशे रुपयांच्या गणवेशासाठी पाचशेच्या बँक खात्याची सक्ती

By admin | Updated: July 11, 2017 01:06 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा निधी तब्बल १५ दिवस विलंबाने जिल्हा स्तरावर पोहोचला आहे.

अखेर गणवेश निधी आला : विद्यार्थी-पालक गोंधळातलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा निधी तब्बल १५ दिवस विलंबाने जिल्हा स्तरावर पोहोचला आहे. मात्र, अद्याप तो शाळा स्तरावर पोहोचलेला नसल्याने गणवेशाचे वांदे झाले आहेत. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांना बँक खाते उघडण्यासाठी पाचशे रुपये खात्यात जमा ठेवण्याची सक्ती केली जात आहे. त्यातून चारशेच्या गणवेशासाठी पाचशेचा भुर्दंड पालकांना पडणार आहे.जिल्ह्यातील १ लाख ५९ हजार विद्यार्थी-विद्यार्थिनींकरिता सर्वशिक्षा अभियानातून यंदा मोफत गणवेश मिळणार नाही. तर त्याऐवजी दोन गणवेशाकरिता ४०० रुपये त्यांच्या बँक खात्यात टाकण्यात येणार आहेत. परंतु, २७ जूनला शाळा सुरू होऊन १५ दिवस उलटल्यावरही महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून जिल्ह्याला निधी देण्यात आला नाही. अखेर मुंबईत झालेल्या तातडीच्या बैठकीनंतर गुरूवारी ६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधी जिल्हा स्तरावर वळता करण्यात आला. मात्र, अद्याप जिल्हा परिषद सीईओंची स्वाक्षरी होऊन निधी शाळा स्तरावर पोहोचण्याची प्रक्रिया बाकी आहे. बुधवारनंतर गणवेशाचे पैसे शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यात टाकण्यात येईल, असे शिक्षण विभागातून सांगण्यात आले. पालकांनी मुला-मुलींना आधी गणवेश खरेदी करून दिल्यानंतर ४०० रुपये विद्यार्थ्यांच्या खात्यात टाकले जाणार आहे. मात्र, अनेक पालकांनी विद्यार्थ्यांचे खाते अद्यापही उघडलेले नाही. तर काही बँका ५०० रुपये जमा ठेवल्याशिवाय खाते पुस्तक विद्यार्थ्यांना देण्यास तयार नाही. ४०० रुपयांसाठी ५०० रुपये जमा करण्याची वेळ पालकांवर आली आहे. त्यामुळे गणवेशाचा निधी थेट मुख्याध्यापकाच्या खात्यात जमा करण्यात यावा, अशी मागणी इंडियन बहुजन टीचर्स असोसिएशनने शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे ई-मेलद्वारे केली आहे.अर्धे तुमचे, अर्धे आमचे आठवीचा गणवेश २०० रुपयात कुठे मिळत असेल तर अधिकाऱ्यांनी आणून दाखवावा, अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली. पालकांना आता अर्धे सरकारचे अर्धे स्वत:चे पैसे टाकूनच गणवेश घ्यावा लागेल.