शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

पाच डॉक्टरांवर तीन लाख नागरिकांच्या आरोग्याची धुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 05:00 IST

उपजिल्हा रूग्णालया संदर्भातील प्रस्ताव स्थानिक पातळीवरून पुढे पाठ‌विण्यात आला आहे. मात्र अद्याप प्रक्रीयेला हवी तशी गती मिळाली नाही. वणी तालुक्यात १२ पेक्षा अधिक कोळसा खाणी आहेत. यासोबतच अनेक उद्योगदेखील आहेत. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर दळणवळण सुरू असते. यातून अपघातही घडतात. या भागात प्रदूषणाचा प्रश्न गंभीर आहे. धूळ प्रदूषणामुळे नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : वेकोलीच्या कोळसा खाणींसह विविध उद्योग असलेल्या वणी तालुक्यातील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. वाढते अपघात व गंभीर आजार लक्षात घेता, तीन लाख नागरिकांच्या आरोग्याची धुरा केवळ पाच डॉक्टरांच्या खांद्यावर आहे. येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे, यासाठी अनेकदा आंदोलने झाली. आश्वासनही मिळाले. परंतु, उपजिल्हा रुग्णालय उभारण्याच्या प्रक्रीयेला अद्याप वेग आलेला नाही. उपजिल्हा रूग्णालया संदर्भातील प्रस्ताव स्थानिक पातळीवरून पुढे पाठ‌विण्यात आला आहे. मात्र अद्याप प्रक्रीयेला हवी तशी गती मिळाली नाही. वणी तालुक्यात १२ पेक्षा अधिक कोळसा खाणी आहेत. यासोबतच अनेक उद्योगदेखील आहेत. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर दळणवळण सुरू असते. यातून अपघातही घडतात. या भागात प्रदूषणाचा प्रश्न गंभीर आहे. धूळ प्रदूषणामुळे नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. असे असताना वणीसारख्या तालुक्याच्या ठिकाणी सुसज्ज अशी शासकीय आरोग्य यंत्रणा असणे अत्यंत गरजेचे आहे. किमान १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय झाल्यास या भागातील रुग्णांना बऱ्यापैकी दिलासा मिळू शकतो. सद्य:स्थितीत वणी ग्रामीण रुग्णालयाची अवस्था अतिशय बिकट आहे. अपघातातील रुग्ण अथवा गंभीर आजाराच्या रुग्णांवर वणीच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नंतर त्यांना चंद्रपूर किंवा यवतमाळ येथे रेफर करण्याचा सल्ला स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांकडून दिला जातो. यामुळे बऱ्याचदा उपचारासाठी चंद्रपूर किंवा यवतमाळकडे निघालेल्या रुग्णाचा वाटेतच मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान वणी ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटरसह नऊ डॉक्टर कार्यरत होते. त्यातील दोन डॉक्टर नियुक्ती झाल्यानंतर रूजूच झाले नाहीत, तर कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर दोन डॉक्टरांना नारळ देऊन घरी पाठविण्यात आले. सद्य:स्थितीत येथे केवळ पाच डॉक्टर कार्यरत आहेत. 

रुग्णालयाच्या पाऊण एकर जागेवर अतिक्रमण - जवळपास साडेसहा एकरच्या परिसरात वणीचे ग्रामीण रुग्णालय उभे आहे. मात्र, यापैकी जवळपास पाऊण एकरवर नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. हे अतिक्रमण हटविण्याबाबत ग्रामीण रुग्णालय स्तरावर पत्रव्यवहार झाले आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या जागेची मोजणी करून घेण्यासाठी पैसेही भरण्यात आले. मात्र, अद्याप जागेची मोजणीच करून देण्यात आली नाही. त्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. 

 

टॅग्स :doctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल