भाविकांची गर्दी : ‘सफलता के पांच कदम’ विषयावरील प्रथम पुष्पपुसद : प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय पुसदच्यावतीने येथील गजानन वाटीका येथे पाच दिवसीय आध्यात्मिक शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा अनिताताई नाईक, जयंतराव पाटील, राधेश्याम जांगीड, डॉ.के.जी. बेलोरकर, डॉ. प्रभा मिश्रा, शिलू दीदी (उमरखेड) व लता दीदी (पांढरकवडा) यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलानाने कार्यक्रमाला सुरूवात झाली. यावेळी शिलू दीदी यांनी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचा परिचय करून देताना हे विश्व विद्यालय १९३६ साली स्थापन झाले असून, आजमितीस १४० देशात याच्या शाखा असल्याचे सांगितले. डॉ. प्रभा दीदी यांनी ‘सफलता के पांच कदम’ या विषयावर प्रथम पुष्प गुंफताना आजचे मानवी जीवन दु:ख आणि अशांत असल्याचे सांगितले. माणूस श्रम करतो, पैसा कमावितो परंतु सुखी नाही. कारण त्याला आध्यात्माची जोड नाही. त्याला स्वत:चे तथा परमात्म्याचे ज्ञान नाही. आपली संस्कृती योगवादी आहे तर पश्चात्यांची संस्कृती भोगवादी आहे. या विद्यालयात परमात्म्याचे ज्ञान दिल्या जाते. विद्यालयाचे लक्ष्य आहे, मानवापासून देवता बनने. आम्ही सकारात्मकतेत नकारात्मकता पाहतो परंतु तसे न करता नकारात्मकतेतही सकारात्मकता पाहण्यास शिकले पाहिजे. आपले भाग्य आपण स्वत: बनवतो, असे त्या म्हणाल्या. यावेळी सर्व पाहुण्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. या अध्यात्मिक शिबिराला मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली होती. (तालुका प्रतिनिधी)
पुसद येथे पाच दिवसीय आध्यात्मिक शिबिराला प्रारंभ
By admin | Updated: March 6, 2017 01:28 IST