शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

वणीत पाच दिवसाचा जनता कर्फ्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 05:00 IST

कोरोनाच्या साखळीला ब्रेक लावण्यासाठी किमान पाच दिवसांचा जनता कर्फ्यू आवश्यक असल्याच्या मुद्यावर सर्वांचे एकमत झाले. याविषयात नागरिकांचीही मागणी असल्याने पाच दिवसाचा जनता कर्फ्यू यावेळी घोषित करण्यात आला. कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी या पाच दिवसांमध्ये कुणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले. या काळात घराबाहेर पडणाऱ्यांविरूद्ध पोलीस प्रशासन कठोर कारवाई करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

ठळक मुद्देसोमवारपासून अंमलबजावणी । ठराविक वेळेत दूध, कृषी साहित्य, मेडिकल, दवाखाने सुरू राहणार

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : शहरात कोरोनाचा सातवा रूग्ण आढळल्यानंतर नागरिकांसह प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी सोमवारपासून वणीत पाच दिवसांचा कडकडीत जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय शनिवारी येथे सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला.या जनता कर्फ्यूत सकाळी ७ ते १० या वेळात केवळ दूध विक्री, कृषी केंद्र, मेडिकल व दवाखाने सुरू राहतील. या काळात पेट्रोलपंप सुरू राहणार असले तरी येथून केवळ आपात्कालिन वाहनांसाठीच इंधन दिले जाणार आहे. वणी शहरात कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी शनिवारी येथील विश्रामगृहावर सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, वणीचे उपविभागीय अधिकारी डॉ.शरद जावळे, ठाणेदार वैभव जाधव, माजी आमदार विश्वास नांदेकर, संजय देरकर, मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर, राष्ट्रवादीचे डॉ.महेंद्र लोढा, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राकेश खुराणा, काँग्रेसचे प्रमोद निकुरे, आरपीआयचे मंगल तेलंग, मिलिंद पाटील, बीएसपीचे प्रवीण खानझोडे, समाजवादी पार्टीचे रज्जाक पठाण हे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी शहरात कोरोना संदर्भाने चिघळत चाललेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. कोरोनाच्या साखळीला ब्रेक लावण्यासाठी किमान पाच दिवसांचा जनता कर्फ्यू आवश्यक असल्याच्या मुद्यावर सर्वांचे एकमत झाले. याविषयात नागरिकांचीही मागणी असल्याने पाच दिवसाचा जनता कर्फ्यू यावेळी घोषित करण्यात आला. कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी या पाच दिवसांमध्ये कुणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले. या काळात घराबाहेर पडणाऱ्यांविरूद्ध पोलीस प्रशासन कठोर कारवाई करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.वणीत वाहनांना प्रवेशबंदीशुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत घोषित करण्यात आलेल्या या जनता कर्फ्यूदरम्यान, खासगी वाहनांना प्रवेश देण्यात येणार नसल्याचे जाहीर करण्यात आले. पाच दिवस केवळ आपात्कालिन वाहनेच ये-जा करतील. याव्यतीरिक्त कोणत्याही वाहनांना वणीत प्रवेश दिला जाणार नाही.वणीत सातवा रूग्ण आढळल्याने चिंतेत वाढशनिवारी प्राप्त झालेल्या आठ रिपोर्टपैकी सात जण निगेटीव्ह, तर एक महिला पॉझिटिव्ह आढळून आली. त्यामुळे प्रशासनाने संंबंधित महिला ज्या परिसरात राहते, तो परिसर सील करण्याच्या कारवाईला प्रारंभ केला आहे. तिच्या कुटुंबासह आजुबाजूच्या काही व्यक्तींना परसोडा येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. जनता कर्फ्यूदरम्यान आपात्कालिन स्थितीत मदत मिळण्याकरिता काही हेल्पलाईन नंबर जारी करण्यात येणार आहेत. त्या क्रमांकावर मदत मिळणार आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या