शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

साडेपाचशे शाळा उतरणार फुटबॉलच्या मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 21:12 IST

आशिया खंडात पहिल्यांदाच होत असलेल्या फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेचे यजमानपद भारताला मिळाले आहे.

ठळक मुद्देजिल्हा फुटबॉलमय : १५ सप्टेंबरला प्रत्येक गावात प्रत्येकासाठी फुटबॉल स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आशिया खंडात पहिल्यांदाच होत असलेल्या फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेचे यजमानपद भारताला मिळाले आहे. त्या पार्श्वभूमिवर महाराष्ट्र शासनाने घोषित केलेल्या ‘मिशन वन मिलियन’ या उपक्रमात जिल्ह्यातील तब्बल साडेपाचशे शाळा सहभागी होणार आहेत. तर १५ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील प्रत्येक गावात प्रत्येक व्यक्तीसाठी फुटबॉलचा खेळ रंगणार आहे.६ ते २४ आॅक्टोबर दरम्यान भारतात फुटबॉल वर्ल्डकप होत आहे. या निमित्ताने राज्यातील मुला-मुलींमध्ये फुटबॉलची आवड निर्माण करण्यासाठी ‘मिशन वन मिलियन’ हा उपक्रम राज्य शासनाने हाती घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक शाळेत फुटबॉलची टीम निर्माण करण्यात येणार आहे.१३ वर्षाखालील मुला-मुलींची चमू तयार करून एकाच दिवशी जिल्ह्या-जिल्ह्यात आणि गावा-गावात फुटबॉल स्पर्धा घेतली जाणार आहे.याबाबत जिल्ह्यातील ११७ शाळांनी शासनाकडे आॅनलाईन नोंदणीही केली आहे. या शाळांसोबतच १५ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील प्रत्येक गावात फुटबॉल स्पर्धा घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे, यात मुले, प्रौढ, अधिकारी, कर्मचारी अशा कोणत्याही व्यक्तीला खेळता येणार आहे.प्रत्येकाने फुटबॉल खेळावा, यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. आॅनलाईन नोंदणी करणाºया शाळांसोबतच पुरेसे मैदान असणाºया शाळांचाही शोध घेतला जात आहे. त्यासाठी जिल्हा क्रीडाधिकाºयांनी शासनाकडे जिल्ह्यातील ५५० शाळांची यादी सादर करण्याची तयारी केली आहे.जिल्ह्यात यवतमाळ, पुसद, वणी, पांढरकवडा, दारव्हा, दिग्रस आदी ठिकाणी फुटबॉलच्या दृष्टीने पोषक वातावरण आहे. मात्र शासनातर्फे आता प्रत्येक शाळेत टीम तयार करून, फुटबॉल देऊन स्पर्धा घेणार आहे.

निवड झालेल्या शाळांना फुटबॉल मिळेल. शालेय स्पर्धांसोबतच जिल्ह्यात आमदार चषक स्पर्धाही घेतली जाणार आहे. त्यासाठी पालकमंत्र्यांशी बोलणे झाले आहे. आजवर कोणत्याही शालेय स्पर्धेत जिल्ह्यातून ४०-४५ पेक्षा अधिक चमू सहभागी झाल्या नाही. मात्र आता साडेपाचशे शाळांनी तयारी दर्शविली आहे.- प्रदीप शेट्ये, जिल्हा क्रीडाधिकारी, यवतमाळ