शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

वन्यजीवांच्या गळ्याला फास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 23:48 IST

तापत्या उन्हाने जंगलातील पाणवठे आटले असून पाण्याच्या शोधात वन्यजीव शेतशिवारात भटकत असल्याचे दिसून येत आहे. नेमकी ही बाब हेरून शिकारी सक्रीय झाले असून वन्यजीवांच्या शिकारीसाठी शेतशिवारात फास लावले जात आहेत.

ठळक मुद्देशेतशिवारात सापळे : जंगलातील नैैसर्गिक जलस्त्रोत कोरडे

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : तापत्या उन्हाने जंगलातील पाणवठे आटले असून पाण्याच्या शोधात वन्यजीव शेतशिवारात भटकत असल्याचे दिसून येत आहे. नेमकी ही बाब हेरून शिकारी सक्रीय झाले असून वन्यजीवांच्या शिकारीसाठी शेतशिवारात फास लावले जात आहेत. या सापळ्यात अडकून अनेक जनावरे शिकाऱ्यांच्या हाती सापडत आहेत. वनविभाग मात्र या विषयात गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.रविवारी सकाळी निळापूर गावालगतच्या शेतशिवारात लावलेल्या सापळ्यात ससा अडकला. मात्र तो शिकाºयाच्या हाती लागण्याअगोदरच एका श्वानाने त्याच्यावर ताव मारला. असेच सापळे अनेक ठिकाणी लावले जात असून वन्यजीवांची बेमालूमपणे शिकार केली जात आहे. वणी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर जंगल आहे. या जंगलात वाघासह सर्वच प्रकारच्या प्राण्यांची संख्या मोठी आहे. त्यात हरिण, ससे, मोर, रानडुक्कर, नीलगाय, रोही आदी वन्यजीव मोठ्या प्रमाणात आढळून येतात. मागील हंगामात अतिशय कमी पाऊस पडल्याने यंदा डिसेंबर महिन्यातच जंगलातील सर्व नैसर्गिक जलस्त्रोतांनी तळ गाठला. सध्या एप्रिल महिन्या सुरू असून उन्हाची तिव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे तहानेने व्याकूळ वन्यजीव पाण्याच्या शोधात लोकवस्त्यांकडे धाव घेत आहेत. त्याचा फायदा घेत शिकाऱ्यांकडून वन्यजीवांची शिकार केली जात असल्याचे दिसते.अन्नसाखळीला धोकालहान-लहान वन्यजीवांच्या शिकारी वाढल्याने प्राण्यांच्या अन्नसाखळीला धोका निर्माण झाला आहे. वन्यजीवांची अन्नसाखळी एकमेकांवर निर्भर असते. मात्र मोर, रानडुकर, ससे यांच्या शिकारी या भागात मोठ्या प्रमाणावर वाढल्या असल्याने या प्राण्यांची संख्या वेगाने घटत असल्याचे निदर्शनास येत आहे. वनविभागाने याकडे लक्ष देण्याची वन्यप्रेमींची मागणी आहे.