शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आधी श्रमदान, नंतरच सप्तपदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 22:12 IST

तालुक्यातील आंधबोरी आणि नांझा ही अतिशय छोटीशी गावे. डोंगरदऱ्या व जंगलाने वेढलेल्या या गावात पाणीटंचाई ही पाचवीलाच पुजलेली. पाणीटंचाईतून कायमची मुक्तता करण्यासाठी संपूर्ण गावाने चंग बांधला.

ठळक मुद्देटंचाईग्रस्त गावे : आंधबोरी व नांझा येथे सामूहिक प्रयत्न

गजानन अक्कलवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : तालुक्यातील आंधबोरी आणि नांझा ही अतिशय छोटीशी गावे. डोंगरदऱ्या व जंगलाने वेढलेल्या या गावात पाणीटंचाई ही पाचवीलाच पुजलेली. पाणीटंचाईतून कायमची मुक्तता करण्यासाठी संपूर्ण गावाने चंग बांधला. यासाठी सामूहिक श्रमदान सुरूझाले. श्रमदानात नित्यनेमाने सहभागी होणाºया नव वर-वधूंनी लग्नाच्या दिवशीही श्रमदान करुन आपला विवाह साजरा केला.नांझा येथील गुणवंत मारोती दाभेकर यांचा विवाह गावातीलच सुषमा रामचंद्र देवनळे हिच्याशी जुळला. तत्पूर्वी या दोन्ही युवक-युवतींनी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी स्पर्धेच्या माध्यमातून प्रयत्न सुरु केले होते. लग्नाच्या दिवशीही त्यांनी श्रमदान करुनच आयुष्यभर एकमेकांची साथ देण्याची शपथ घेतली.आंधबोरी येथील भारती भोयर हिचा विवाह नांदुरा येथील प्रशांत पोटकुले याचेशी जुळला. गावाला पाणीदार करण्यासाठी अख्ख आंधबोरी मग्न आहे. भोयर कुटुंबही खारीचा वाटा उचलत आहे. सत्यमेव जयते पाणी फाऊंडेशनच्या वाटर कप स्पर्धेच्या निमित्ताने संपूर्ण गाव एकदिलाने एकत्र आले आहे. सर्वजण मनापासून श्रमदानात गुंतले आहे. ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ हा जलसंधारणाचा मूलमंत्र घेऊन गावाने सकारात्मक आणि आशावादी वाटचाल सुरु केली आहे. गावातील आबालवृध्द मोठ्या उत्साहाने श्रमदानात आपला वाटा उचलत आहे. नवदाम्पत्यानेही या गावात श्रमदान केले.लग्नाच्या दिवशीही श्रमदान करुन कुठलेही तत्वज्ञान न सांगता समाजापुढे एक आदर्श निर्माण केला. आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात श्रमदानाने व्हावी यासाठी या जोडप्यांनी आधी श्रमदान नंतर सप्तपदी केली. हा त्यांचा सर्व खटाटोप गावाला पाणीटंचाईतून मुक्त करण्यासाठी होता.