शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मांसाहार खालेल्लं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
2
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
3
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
4
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
5
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
6
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
7
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
8
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
9
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
10
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
11
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
12
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
13
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
14
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
15
काळजी घ्या! मार्केटमध्ये नवीन स्कॅम आला, व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका पाठवून बँक खाते रिकामे करतात
16
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
17
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न
19
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार
20
IB Recruitment: गुप्तचर विभागात ज्युनियर ऑफिसर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता

नेरमध्ये डिजीटल शाळेचा पहिला मान मंगरूळला

By admin | Updated: August 10, 2015 02:09 IST

तालुक्यात डिजीटल शाळेचा पहिला मान मंगरूळ या गावाने मिळविला आहे. ७०० लोकसंख्येच्या या गावातील शाळेच्या शिक्षकांनी मोठ्या प्रयत्नातून ही उपलब्धी मिळविली आहे.

नेर : तालुक्यात डिजीटल शाळेचा पहिला मान मंगरूळ या गावाने मिळविला आहे. ७०० लोकसंख्येच्या या गावातील शाळेच्या शिक्षकांनी मोठ्या प्रयत्नातून ही उपलब्धी मिळविली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी सुरू केलेले प्रयत्न प्रेरणा देणारे आहे. शाळा डिजीटल करायचीच या ध्येयाने सदर शाळेचे मुख्याध्यापक विनोद टोंगे, शिक्षक जगदीश खाडे आदींनी त्या दिशेने वाटचाल सुरू केली. शाळा डिजीटल करण्यासाठी शासनाकडून कुठलाही निधी मिळणार नाही, लोकसहभागातूनच ही उपलब्धी मिळवायची आहे, असे शिक्षण विभागाच्या बैठकीत सांगण्यात आले. गाव अविकसित असल्याने लोकसहभागातून शाळा डिजीटल करायची कशी, यावर विचार विनिमय करण्यात आला. यातून मार्ग सापडला. शाळेकडे १३ एकर शेती आहे. ही शेती मक्त्याने दिली जाते. यातून मिळणारी रक्कम शाळेच्या कोशात जमा करण्यात येते. याच रकमेचा उपयोग शाळा डिजीटल करण्यासाठी करता येईल, असा विचार शाळा व्यवस्थापन समितीपुढे मांडण्यात आला. जमा असलेल्या रकमेपैकी ९० हजार रुपये समितीकडून मंजूर करून प्रस्ताव गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आणि तो मंजूरही झाला. या निधीतून शाळेची रंगरंगोटी करण्यात आली. वर्गामध्ये स्मार्ट बोर्ड लावण्यात आले. मुख्याध्यापक विनोद टोंगे यांनी स्वखर्चातून लॅपटॉपही खरेदी केला. आता या माध्यमातून वर्ग एक ते पाचच्या विद्यार्थ्यांना नवनवीन ज्ञान मिळणार आहे. पाठ्यपुस्तकातील प्रयोग, ठिकाणे आदी बाबींची माहिती प्रत्यक्ष स्मार्ट बोर्डवर दिसणार असल्याने दीर्घकाळ या बाबी स्मरणात राहणार आहे. यातूनच विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर यांच्या मार्गदर्शनात हा प्रयोग यशस्वी झाला आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धर्मराज चव्हाण, श्रीकृष्ण राठोड, केशव आडे, सतीश अहिरे, किसन गणवीर, अंजिता धारगावे, मीना घरडे, सुनीता चव्हाण, सुरेश जाधव, शालीनी चव्हाण आदींचे मार्गदर्शन आणि सहकार्यही यासाठी मोलाचे ठरले आहे. (तालुका प्रतिनिधी)