शहरं
Join us  
Trending Stories
1
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
2
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
3
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
4
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
5
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
6
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
7
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
8
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
9
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
10
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
11
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
12
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
13
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
14
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
15
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
16
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
17
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
18
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
19
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
20
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी

शुक्रवारपासून अभियांत्रिकीची प्रथम फेरी

By admin | Updated: June 25, 2015 02:30 IST

जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात विकल्प अर्ज (आॅप्शन फॉर्म) कसा भरावा ...

कार्यशाळा : ‘जेडीआयईटी’मध्ये विकल्प अर्जाची नि:शुल्क सेवायवतमाळ : प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशाची प्रथम फेरी शुक्रवार २६ जूनपासून सुरू होत आहे. याच दिवशी स्थानिक जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात विकल्प अर्ज (आॅप्शन फॉर्म) कसा भरावा याबाबतची विशेष कार्यशाळा सकाळी ११.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. शिवाय या महाविद्यालयात विकल्प अर्ज भरण्याची नि:शुल्क सेवा २६ ते २८ जूनपर्यंत १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे. विकल्प अर्ज भरणे हा अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेतील एक महत्वाचा आणि निर्णायक टप्पा आहे. या आॅनलाईन अर्जात विद्याथ्यांने स्वत:च्या पसंतीचे महाविद्यालय व त्यातील पसंतीची शाखा (ब्रँच) याचा पसंतीक्रम देणे अपेक्षित असते. परंतु योग्य माहिती आणि मार्गदर्शनाअभावी बऱ्याचदा चुकीचे विकल्प निवडले जातात. यात विद्यार्थ्यांचे नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी ‘जेडीआयईटी’मध्ये २६ जून रोजी सकाळी ११.३० वाजता कार्यशाळा घेण्यात येत आहे. या कार्यशाळेत विकल्प अर्ज कसा भरावा, त्याची प्रक्रिया, योग्य ते महाविद्यालय कसे निवडावे, आवडीच्या शाखांचा पसंतीक्रम कसा ठरवावा, कॅप प्रक्रियेचे राऊंडस्, कट-आॅफ आदी विषयांवर प्रा. डॉ. संजय गुल्हाने मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळा आणि विकल्प अर्ज भरण्यासाठी उपलब्ध असलेल्या इंटरनेट नि:शुल्क सुविधेचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा अशी विनंती संस्थेचे सचिव किशोर दर्डा, प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर यांनी केली आहे. अधिक माहितीसाठी प्रवेश प्रक्रिया प्रमुख प्रा. विवेक गंधेवार (९७६३७०२५६९), प्रा. संदीप सोनी (९७६३७०२५८३) यांच्याशी संपर्क साधता येईल. (वार्ताहर)