पहिला पेपर : वर्षभर केलेल्या कष्टाचा प्रामाणिकपणा सिद्ध करण्याची संधी आलीय. बारावीची परीक्षा गुरुवारपासून सुरू झाली. पहिलाच पेपर कसोटी पाहणाऱ्या इंग्रजीचा होता. जिल्ह्यात १०१ केंद्रांवर गुरुवारी हा पेपर पार पडला. यवतमाळातील शिवाजी विद्यालयात पेपर देऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर मोठा गड सर केल्याचे समाधान होते. काय चुकले, काय लिहायचे राहून गेले आदींची चर्चाही या गर्दीत रंगलेली होती. त्याच वेळी पुढच्या पेपरसाठी तयारी कुठवर आली याचे आडाखेही बांधले जात होते.
पहिला पेपर :
By admin | Updated: February 19, 2016 02:37 IST