लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : रस्ता रूंदीकरणासाठी तोडल्या जाणाºया वृक्षांचे पुनर्रोपण करण्याचा पहिला प्रयोग यवतमाळात हाती घेण्यात आला. शुक्रवारी कडुनिंबाचे वृक्ष दुसºया ठिकाणी हलविण्यात आले.धामणगाव मार्गावरील ५५ वृक्ष पुर्नस्थापित केले जाणार आहे. यामुळे शतकोत्तरी वृक्ष वाचणार आहेत. पर्यावरणाचा ºहासही थांबणार आहे. यवतमाळ ते धामणगाव मार्गाच्या रूंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला कडुनिंबाचे ब्रिटीशकालीन वृक्ष आहेत. १०० वर्षे जुन्या वृक्षांना रस्ता रूदीकरणात तोडले जात आहे. अखेर पालकमंत्री मदन येरावार, बांधकाम अधीक्षक अभियंता शशिकांत सोनटक्के यांनी पुढाकार घेत हे वृक्ष वाचविण्यासाठी त्यांच्या पुनर्रोपणाचा निर्णय घेतला. मुंबई येथील ‘क्रिएटीव्ह ग्रुप’कडे हे काम सोपविण्यात आले. त्यानुसार ५५ वृक्ष जांब रोडवरील वन उद्यानाच्या जागेवर पुर्नस्थापित केले जाणार आहे.धामणगाव रोडवरील एका कडुनिंब वृक्षाची शुक्रवारी या पद्धतीने पुनस्थापना करण्यात आली. यावेळी बघ्यांनी प्रचंड गर्दी केली होती.अशी होते झाडांची निवडपुर्नस्थापना करण्यासाठी सुदृढ वृक्षांचे पुर्नरोपण करण्यापूर्वी आठ दिवस आधी विशिष्ट औषधांची फवारणी केली जाते. नंतर एक फूट परिघामध्ये चारही बाजूंनी आठ फूट खोल खोदण्यात येते. नंतर हायड्रॉच्या मदतीने हे वृक्ष वर खेचले जाते. त्यावर औषधांची फवारणी होते. पुढील २१ दिवस या वृक्षाला पाणी, खत आणि फवारणीच्या माध्यमातून जपले जाते.
वृक्ष पुनर्रोपणाचा पहिला प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 00:03 IST
रस्ता रूंदीकरणासाठी तोडल्या जाणाºया वृक्षांचे पुनर्रोपण करण्याचा पहिला प्रयोग यवतमाळात हाती घेण्यात आला. शुक्रवारी कडुनिंबाचे वृक्ष दुसºया ठिकाणी हलविण्यात आले.
वृक्ष पुनर्रोपणाचा पहिला प्रयोग
ठळक मुद्देशंभर वृक्ष : क्रेनने उचलून जांब रोडवरील वनउद्यानात लावणार