यवतमाळ : लोकमत-समाचार-टाईम्स सखी मंचच्यावतीने आयोजित ‘जोश’च्या पहिल्या दिवशी विविध स्पर्धांमध्ये उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवत आपल्यातील कलागुणांचे प्रदर्शन केले. येथील दर्डा मातोश्री सभागृहात आयोजित या स्पर्धेत पहिला दिवस गाजला तो सोलो नृत्य स्पर्धेने. स्वातंत्र संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी आणि सखी मंचच्या संस्थापक अध्यक्षा दिवंगत ज्योत्स्ना दर्डा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पहिल्या दिवशीच्या स्पर्धेला सुरूवात झाली. सर्वप्रथम डोहाळे गीत (पाळणा गीत) स्पर्धा झाली. सखींनी यात विविध डोहाळे गीत सादर केले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक सरला चिद्दरवार, व्दितीय क्रमांक स्मीता गंधे आणि तृतीय क्रमांक विद्या बेहरे यांनी पटकाविला. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून मेघा इसराणी, प्राप्ती चिंतावार यांनी काम पाहिले. त्यांचे स्वागत गंगा राठोड, विद्या बेहरे यांनी सखी मंचचे स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. यानंतर वाटण्यापासून नमकीन पदार्थ तयार करण्याची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धे प्रथम क्रमांक कांचन निंबेकर आणि व्दितीय क्रमांक अॅड़ सरोज बरदेहे यांनी पटकाविला. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून नंदा तलरेजा आणि अर्चना इसराणी यांनी काम पाहिले. त्यांचे स्वागत माला टाके व अल्पा व्यास यांनी सखी मंचचे स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन केले. यानंतर थर्माकोलपासून दागिने तयार करण्याची स्पर्धा घेण्यात आली. यावेळी सखींनी थर्माकोलपासून सुरेख दागिणे तयार केले होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांक जयश्री तळणकर, व्दितीय क्रमांक योगीता उघडे आणि तृतीय क्रमांक कविता लढ्ढा यांनी पटकाविला. परीक्षक म्हणून पूजा बाजोरिया आणि शोभा नेमाणी यांनी काम पाहिले. त्यांचे स्वागत अॅड़ सरोज बरदेहे आणि मेघा डाहे यांनी सखी मंचचे स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन केले. चिन्हाचा उपयोग करून रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक कांचन निंबेकर, व्दितीय दीपाली झोपाटे आणि तृतीय क्रमांक सीमा कोकेवार यांनी पटकाविला. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून राखी खत्री, ज्योती गोल्हर यांनी काम पाहिले. त्यांचे स्वागत जयश्री मडावी, उषा सरमखे यांनी सखी मंचचे स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन केले. यानंतर घेण्यात आलेल्या हास्य नाटिका स्पर्धेत प्रथम क्रमांक छाया राठी व अरुणा चांडक यांनी तर व्दितीय क्रमांक माला टाके व अल्पा व्यास यांनी पटकाविला. परीक्षक म्हणून शुभदा हातगावकर, विद्या बेहरे यांनी काम पाहिले. त्यांचे स्वागत स्मीता गंधे यांनी सखी मंचचे स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन केले. सायंकाळी दर्डा मातोश्री सभागृहात सोलो डान्स स्पर्धा घेण्यात आली. यावेळी सखींनी एकापेक्षा एक सरस नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक मानसी सांगानी यांनी पटकाविला. परीक्षक म्हणून आशंता बुटले यांनी काम पाहिले. त्यांचे स्वागत छाया राठोड यांनी सखी मंचचे स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन केले. स्पर्धेतील सर्व विजेत्या स्पर्धकांना लोकमत सखीमंचच्या जिल्हा प्रमुख सीमा दर्डा यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. (उपक्रम प्रतिनिधी) सखी मंच सदस्य नोंदणी लोकमत सखी मंचच्या सदस्य नोंदणी मोहिमेला सुरुवात झाली आहे. ५०० रुपये शुल्क भरुन सखींना सदस्य होता येणार आहे. सदस्य होणाऱ्या सखींना अंजली कंपनीचे फ्रायपॅन गिफ्ट दिले जाणार आहे. नोंदणीसाठी लोकमत सखी मंचच्या जिल्हा प्रमुख सीमा दर्डा, दर्डानगर, लोकमत जिल्हा कार्यालय गांधी चौक यवतमाळ (०७२३२-२४८११९), सुषमा गणात्रा, आर्णी रोड (८०८७२३८४८७), शारदा गांधी, धामणगाव रोड (९९२३३३३६२०), अलका राऊत, जलाराम बाप्पा मंदिराजवळ, श्रीकृष्णनगर (९९२२६६१४८७), छाया राठोड, अंजनेय सोसायटी (७५०७६३०१७०), छाया राठी, आशुतोष अपार्टमेंट, सत्यनारायण ले-आऊट (९४२०६२२७९९) यांच्याशी संपर्क साधावा.
‘जोश’च्या पहिल्या दिवशी सखींनी गाजविल्या स्पर्धा
By admin | Updated: January 8, 2017 00:59 IST