शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

वागद येथे पहिल्यांदाच पोहोचली एसटी बस

By admin | Updated: July 4, 2015 02:43 IST

अडाण नदीच्या काठावर असलेल्या वागद येथे आजपर्यंत जाण्यासाठी रस्ताच नव्हता. भौतिक सोयीसुविधांपासून हे गाव कोसो दूर होते.

महागावकसबा : अडाण नदीच्या काठावर असलेल्या वागद येथे आजपर्यंत जाण्यासाठी रस्ताच नव्हता. भौतिक सोयीसुविधांपासून हे गाव कोसो दूर होते. आजही गावाच्या वेशीपर्यंत पायदळच जावे लागत होते. मुख्य रस्त्यावर येण्यासाठी वागद ते महागाव अशी पायपीट करावी लागत होते. बरेच वर्षानंतर ग्रामस्थांचे भाग्य फळाला आले. बसफेरी सुरू झाल्याचा आनंद ग्रामस्थांमधून ओसंडून वाहत होता. बुधवारी १ जुलैला गावात एसटी बस आल्याचे पाहून चक्क अनेकांनी बसची पूजा केली. चालक व वाहकाला ग्रामस्थांनी शेला, नारळ देऊन स्वागत केले. मिठाई वाटून हा आनंद साजरा करण्यात आला. वागद या गावाला अडाण नदीचा वेढा असल्याने गावात येण्यासाठी मार्गच नव्हता. त्यामुळे ग्रामस्थांची आजतागायत पायपीट सुरू होती. शेवटी वागद ते महागाव हा रस्ता तयार करण्यात आला. मात्र या मार्गाने बसफेरीच सुरू नसल्याने येथील विद्यार्थी व ग्रामस्थांना पायपीट करत जावे लागत. ही गंभीर बाब अनेक दिवसांपासून ग्रामस्थांना सलत होती. आधुनिक तंत्रज्ञानाने जग जवळ येत असतानाच वागद येथे साधी बसफेरीही नव्हती. गावातून बसफेरी सुरू व्हावी यासाठी ग्रामस्थांनी दारव्हा आगार विभाग नियंत्रकाकडे अर्ज दिला. विभाग नियंत्रकांनी यावर सकारात्मक निर्णय घेऊन बसफेरी सुरू केली. १ जुलैला वागद येथे बस येणार म्हणून गावातील महिलांनी जय्यत यारी केली होती. रस्त्यांवर रांगोळ््या काढून स्वागत करण्यात आले. अनेक वर्षांपासूनची इच्छा पूर्ण झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंद व्यक्त होत होता. त्यांनी एसटी महामंडळाची बस गावात आल्यानंतर सरपंच वसुंधरा ज्ञानेश्वर ठाकरे, उपसरपंच नंदू फुुलसिंग चव्हाण, ज्ञानेश्वर ठाकरे, तुळशीराम जाधव, शाळा समितीचे सदस्य यांनी एकत्र येऊन बस गाडीचे स्वागत केले. हा सोहळा आजच्या आधुनिक युगात सर्वांसाठी धक्का देणारा आहे. (वार्ताहर)