शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
5
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
6
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
7
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
8
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
9
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
10
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
11
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
12
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
13
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
14
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
15
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
16
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
17
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
18
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
19
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
20
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी

पुसद, फुलसावंगी येथे आग

By admin | Updated: December 13, 2015 02:31 IST

पुसद येथे घराला तर फुलसावंगी येथे मोबाईल शॉपीला आग लागून सात लाख रुपयांचे नुकसान झाले. या दोन्ही घटना शनिवारी घडल्या.

पुसद/फुलसावंगी : पुसद येथे घराला तर फुलसावंगी येथे मोबाईल शॉपीला आग लागून सात लाख रुपयांचे नुकसान झाले. या दोन्ही घटना शनिवारी घडल्या. नवीन पुसद भागातील भगिरथा पुंडलिक भोरकडे या रोजमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेच्या घराने दुपारी पेट घेतला. पाहता-पाहता संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. घरातील कपडे, धान्य आदी साहित्याचा कोळसा झाला. आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी मिळेल त्या साधनांव्दारे आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत घरातील साहित्याची हानी झाली होती. वृत्त लिहिस्तोवर पोलिसांकडून कारवाई सुरू होती. मोबाईल गॅलरीचे पाच लाखांचे नुकसानमहागाव तालुक्याच्या फुलसावंगी येथील बसस्थानक परिसरात असलेल्या मोबाईल गॅलरीला लागलेल्या आगीत मोबाईलसह पाच लाख रुपयांच्या साहित्याची हानी झाली. दीपक रामराव जाधव यांचे बसस्थानक परिसरात मोबाईल विक्रीचे दुकान आहे. दुकान बंद करून ते घरी परतले. रात्री कापसाचे ट्रक भरणाऱ्या काही मजुरांना या दुकानाला आग लागल्याचे लक्षात आले. ही बाब तत्काळ जाधव यांना कळविण्यात आली. परिसरातील नागरिकांनी मिळेल त्या साधनांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. पाहता पाहता आगीने रौद्ररुप धारण करत मोबाईल शॉपीमधील सर्व वस्तू आपल्या कवेत घेतल्या. अवघ्या काही वेळात विविध कंपन्यांचे मोबाईल, सीमकार्ड, इर्न्व्हटर, कॉम्प्युटर, फर्निचर अशा पाच लाख रुपयांच्या साहित्याचा कोळसा झाला. आगीचे कारण कळू शकले नाही. (प्रतिनिधी)