शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरा जिनिंगमध्ये आगीचे तांडव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 21:42 IST

येथील निळापूर मार्गावर असलेल्या इंदिरा कॉटन प्रोसेसर या जिनिंगला सोमवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत कापूस, जिनिंगमधील अनेक यंत्र जळून खाक झाले. त्यात १० ते ११ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सायंकाळी उशिरापर्यंत ही आग धुमसत असल्याने ती विझविण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न सुरू होते.

ठळक मुद्देवणीतील घटना : ११ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : येथील निळापूर मार्गावर असलेल्या इंदिरा कॉटन प्रोसेसर या जिनिंगला सोमवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत कापूस, जिनिंगमधील अनेक यंत्र जळून खाक झाले. त्यात १० ते ११ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सायंकाळी उशिरापर्यंत ही आग धुमसत असल्याने ती विझविण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न सुरू होते.वणी येथील आनंद मामराजजी अग्रवाल यांच्या मालकीची ही जिनिंग आहे. सोमवारी नेहमीप्रमाणे कामगार या जिनिंगमध्ये जिनिंग प्रोसेसिंगचे काम करीत असताना ब्लोअरच्या मोटारमधून अचानक शॉटसर्कीट झाले. त्यामुळे आग लागली. पाहता-पाहता या आगीने रौद्ररुप धारण केले. तेथे उपस्थित कामगारांनी पाण्याच्या सहाय्याने आग विझविण्याचे प्रयत्न कसुरू केले. मात्र आग विझण्याऐवजी वाढतच होती. त्यामुळे जिनिंगमधील कामगारांची चांगलीच तारांबळ उडाली.या आगीत २०० क्विंटल कापूस १४ रेचे मशीन, दोन ते तीन ब्लोअर मशीन, २०० क्विंटल कापसाच्या गाठी जळून खाक झाल्याने १० ते ११ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.नव्या वर्षापासूनची वणी उपविभागात आगीची ही चौथी घटना आहे. सिंदोला, मुकुटबन, व वणी शहरात आगीच्या दोन घटना घडल्या आहेत, तर २०१६ ते १७ या एकाच वर्षात या भागात आगीच्या ७० घटना घडल्यात. आगीच्या घटनांची वाढती संख्या लक्षात घेता, येथे सक्षम अग्नीशमन यंत्रणा नाही, हे विशेष.अग्निशमन दलाच्या पांगळेपणाचा फटकाआग लागल्यानंतर जिनिंगच्या प्रशासनाने तात्काळ वणी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाशी संपर्क साधला. मात्र वाहन नादुरस्त असल्याचे अग्निशमन यंत्रणेकडून सांगण्यात आले. मात्र नंतर सदर वाहन आग विझविण्यासाठी घटनास्थळावर पोहचले. तोवर अग्निशमन दलाच्या पांगळेपणाचा जिनिंगला चांगलाच फटका बसला. येथील अग्निशमन यंत्रणा २२ वर्षे जुनी आहे. नवीन यंत्रणेचा ७० लाखांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात पडून आहे. मात्र तो प्रस्ताव अद्यापही पुढे सरकला नाही.