शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

दारव्हा तहसील कार्यालयाला आग; संगणकासह महत्त्वाचे दस्तावेज खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 16:25 IST

प्रथम तहसील कार्यालयातील आवक-जावक विभागात आग लागली.

दारव्हा : येथील तहसील कार्यालयात गुरुवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत दोन संगणक संच, प्रिंटर यासह संपूर्ण वायरींग व काही महत्त्वाचे दस्तावेज खाक झाले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगितले जाते. या घटनेची माहिती मिळताच तहसीलचे अधिकारी, कर्मचारी, नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले.

प्रथम तहसील कार्यालयातील आवक-जावक विभागात आग लागली. नंतर वायरिंगमुळे बाहेरील बाजूस आग पसरली. आग इतकी भीषण होती की पाहता-पाहता संपूर्ण तहसील कार्यालय धुराने वेढले गेले. त्याचवेळी तहसील कार्यालयातून धूर निघत असल्याचे काही पोलीस कर्मचा-यांना दिसले. त्यांनी लगेच कार्यालयात धाव घेतली. तेव्हा आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तहसीलदारांना माहिती दिली. तहसीलदार अरुण शेलार व इतर अधिकारी, कर्मचा-यांनी लगेच तहसीलमध्ये पोहोचून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले.

अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळाले. या आगीत आवक-जावक विभागातील दोन संगणक संच, प्रिंटर, पंखा, काही दस्तावेज व कार्यालयातील संपूर्ण वायरिंग जळून खाक झाली. तसेच माहिती पत्रके, पोस्टर, सागवान लाकूड आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.मोठा अनर्थ टळलातहसीलला आग लागल्याचे पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी तहसीलदारांना माहिती दिली. नंतर अग्निशमन दलाला पाचारण करून आग विझविली. वेळीच सर्वांनी धावपळ केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. अन्यथा कार्यालयातील सर्व महत्त्वाचे दस्तावेज, जुने रेकॉर्ड, संगणक संच व इतर साहित्य जळून खाक झाले असते. इंग्रजकालीन असलेल्या या कार्यालयातील इलेक्ट्रिक वायरिंग खूप जुनी झाली. यापूर्वीही आग लागून वायरिंग जळाली होती. यावेळीसुद्धा वायरींमधील शॉर्ट सर्किटमुळेच आग लागली. त्यामुळे तहसीलमधील संपूर्ण वायरिंग दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ