शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

दिग्रसमध्ये आग लागून दुकानांचे नुकसान

By admin | Updated: June 5, 2016 02:14 IST

येथील नगरपरिषदेच्या जुन्या चुंगी नाक्याजवळ असलेल्या कचऱ्याने पेट घेतल्याने लगतच्या लहान मोठ्या

कचऱ्यामुळे पसरली आग : पाण्यासाठी अग्निशमन वाहनाचे हेलपाटेदिग्रस : येथील नगरपरिषदेच्या जुन्या चुंगी नाक्याजवळ असलेल्या कचऱ्याने पेट घेतल्याने लगतच्या लहान मोठ्या व्यावसायिकांच्या दुकानांना आग लागली. ही घटना शुक्रवारी ३ जून रोजी रात्री ९.३० वाजता घडली.या बाबत सविस्तर वृत्त असे की, दिग्रस नगरपरिषदचा जुन्या बसस्थानकालगतच्या मध्यवर्ती चुंगी नाक्याजवळ काडी कचरा पसरला आहे. या कचऱ्याने पेट घेतला. ही आग हळूहळू लगतच्या सुकलेल्या पाला पाचोळ्यामुळे पसरत गेली. लहान मोठ्या लाकूड फाट्यच्या दुकानांसह नाक्याच्या माळवदसदृश इमारतीला आगीने आपल्या कवेत घेतले. रात्री ९.३० वाजताच्या दरम्यान आगीच्या ज्वाळा नागरिकांना दिसल्या. त्यानंतर या घटनेची माहिती पोलीस ठाणे व नगरपरिषद अधिकाऱ्यांना कळविण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत नगरपरिषदेने आपले अग्निशमन वाहन घटनास्थळी रवाना केले. अग्निशमनच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. पण काही भागाची आग विझत असताना वाहनामधले पाणी संपले. हेच वाहन पुन्हा पाणी भरण्यासाठी देवनगरस्थित पाण्याच्या टाकीवर गेले. काही मिनिटांतच पाणी घेऊन परत आले व पुन्हा आग विझविण्याचा प्रयत्न सुरू झाला.या आगीत आसिफ वर्कशॉप, भलगे पान सेंटर, शुभम पेपर स्टॉल, बाँबे इलेक्ट्रिक, स्प्रे प्रिंटिंग, कलीम बॅटरी, गुड गॅरेज, इस्लामी हॉटेल यासह अनेक लहान मोठ्या दुकानांचे नुकसान झाले आहे. वेळेत आग विझविण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला. ही आग बघण्यासाठी शेकडो नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. नागरिक व मुख्य रस्त्याची वाहतूक सांभाळताना पोलीस विभागाने केलेले प्रयत्न यशस्वी ठरले. तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली. लहान मोठ्या सर्व व्यावसायिकांनी सुटकेचा श्वास सोडला. या आगीमुळे नेमके किती नुकसान झाले याचा तपशील कळू शकला नाही. (प्रतिनिधी)