शहरं
Join us  
Trending Stories
1
"BMC आयुक्त कोण आहे, नाव लिहून ठेवा; कंट्रोल मुख्यमंत्र्यांकडेच आहे..."; मनोज जरांगेंचा इशारा
2
शरद पवारांचा 'सुसाईड बॉम्ब' म्हणून जरांगेंकडे पाहतात; भाजपा आमदार संजय केनेकरांचं खळबळजनक विधान
3
Manoj Jarange Patil Morcha Update Live: आम्हाला राजकारण करायचे नाही, फक्त आरक्षण पाहिजे, मराठा आंदोलकांना त्रास देऊ नका- मनोज जरांगे
4
राजिनाम्यानंतर जगदीप धनखड यांचा पेन्शनसाठी अर्ज, कोण कोणत्या सुविधा मिळणार?
5
Delhi Murder Video: भाविकांचं राक्षसी कृत्य! देवीचा प्रसाद मिळाला नाही, सेवेकऱ्याला जीव जाईपर्यंत मारलं; दिल्ली हादरली
6
अमेरिकेचे नवं पाऊल...भारताला बसू शकतो मोठा झटका; १.६ अब्ज डॉलर्स गुंतवणूक धोक्यात
7
'शोले'मधून सचिन पिळगावकरांचा 'हा' सीन केलेला कट, पण फोटो आला समोर; अभिनेत्याला वाटलेलं वाईट
8
मनोज जरांगेंच्या आंदोलनाची तीव्रता वाढताच राज्य सरकारकडून मराठा आरक्षणाबद्दल पहिला निर्णय
9
जम्मूतील रियासी, रामबन जिल्ह्यात भूस्खलनामुळे हाहाकार! तीन मृतदेह सापडले, अनेक जण बेपत्ता
10
डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका, US न्यायालयानं टॅरिफ निर्णय ठरवला अवैध; काय म्हणाले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष?
11
Dilshan Madushanka ODI Hattrick : या पठ्ठ्यानं अखेरच्या षटकात हॅटट्रिकचा डाव साधत फिरवली मॅच
12
रितेश देशमुखचा मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा, म्हणाला- "मनोज जरांगेजी हे..."
13
"मराठी चित्रपटासाठी दोनदा कॉम्प्रोमाइज केलं", मेघा घाडगेचा धक्कादायक खुलासा, सांगितली इंडस्ट्रीची काळी बाजू
14
घुसखोरांना रोखण्यासाठी सीमेवर भिंत उभारणार का? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल
15
'त्या' व्हिडिओवर श्रीसंतची बायको संतापली; तिनं ललित मोदीसह मायकेल क्लार्कचीही काढली लाज; म्हणाली...
16
उत्तर भारतात ढगफुटी अन् भूस्खलनामुळे जलसंकट, उत्तराखंडमध्ये ढगफुटी तर हिमाचल प्रदेशात भूस्खलन; वैष्णोदेवी यात्रा स्थगित
17
VIDEO: फुल्ल ऑन राडा... नितीश राणाला भिडला दिग्वेश राठी, खेळाडू मध्ये पडले म्हणून नाहीतर...
18
भारतात हरित ऊर्जा, उत्पादन, तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम संधी, पंतप्रधान मोदींनी जपानच्या दौऱ्यात दिली माहिती
19
​बीडजवळ काळ बनून आला ट्रक; भीषण अपघातात ६ भाविकांचा जागीच मृत्यू
20
"तेव्हापासून आमच्यात…", 'सैराट' फेम आकाश ठोसरसोबतच्या रिलेशनशीपच्या चर्चेवर रिंकू राजगुरू स्पष्टच म्हणाली..

गुन्हेगार शोधा अथवा खुर्च्या खाली करा

By admin | Updated: July 29, 2015 02:22 IST

जिल्हाभरात प्रॉपर्टी व शरीरासंबंधीचे गुन्हे वाढले आहे. पोलिसांप्रती गुन्हेगारांमध्ये भय उरलेले नाही.

सर्व डीबी पथकांना तंबी : एसपींनी घेतला क्लास, दोन आठवड्यांचा अल्टीमेटम, डिटेक्शनच्या टिप्स्यवतमाळ : जिल्हाभरात प्रॉपर्टी व शरीरासंबंधीचे गुन्हे वाढले आहे. पोलिसांप्रती गुन्हेगारांमध्ये भय उरलेले नाही. अशा गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून गुन्हे उघडकीस आणा अन्यथा खुर्च्या खाली करा, अशा शब्दात जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी मंगळवारी जिल्हाभरातील डीबी पथकांना तंबी दिली. जिल्हाभरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या डीबी स्कॉडमध्ये (शोध पथक) कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांचा खुद्द एसपींनी मुख्यालयात वर्ग घेतला. २९ पोलीस ठाण्यांचे शंभरावर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. डिटेक्शनची प्रमुख जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांनाही यात सहभागी करून घेण्यात आले होते. यावेळी संबंधित सर्व शाखांचे अधिकारी हजर होते. एसपींनी यावेळी या पोलीस कर्मचाऱ्यांना गुन्हे उघडकीस आणण्यासाठी काही टिप्स्ही दिल्या. यवतमाळ शहर व परिसरासह संपूर्ण जिल्ह्यातच गेल्या काही दिवसांपासून चोऱ्या-घरफोड्या, खून, खुनाचा प्रयत्न या सारखे गुन्हे वाढले आहेत. यवतमाळ शहरात तर भरदिवसा घरांना निशाणा बनविले जात आहे. सुरक्षित समजल्या जाणाऱ्या कॉलण्या-वसाहतींमध्ये सुद्धा चोऱ्या होऊ लागल्या आहेत. एकतर गुन्हे घडण्याआधी त्याला प्रतिबंध घातला जावा, त्यानंतरही गुन्हा घडलाच तर तो तत्काळ उघडकीस यावा, अशी अपेक्षा एसपींनी या डीबी पथकांकडून व्यक्त केली. अनेक प्रकरणात केवळ आरोपींच्या अटकेची खानापूर्ती केली जाते. लगतच्या ठाण्यात कुणी आरोपी अटक झाल्यास समकक्ष गुन्ह्यात त्या आरोपींना ट्रान्सफर करून गुन्ह्याचा तपास पूर्ण केला जातो. मात्र अशा गुन्ह्यांमध्ये जप्ती होत नाही. कित्येकदा छुटपुट जप्ती दाखवून तपास पूर्ण झाल्याचा देखावा निर्माण केला जातो. परंतु यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा अखिलेशकुमार सिंह यांनी दिला. तुमचे वेगळे नेटवर्क आहे, तुमच्यात गुन्हे उघडकीस आणण्याचे टॅलेंट आहे, परिश्रम करण्याची तयारी आहे. तुमच्यातील या गुणांमुळेच तुम्हाला या डीबी स्कॉडमध्ये सिलेक्ट केले गेले. त्यामुळे गुन्हे उघडकीस आणण्याची अपेक्षा तुमच्याकडूनच आहे. तुमच्या ठाण्याच्या हद्दीत घडलेले गुन्हे पुढील दोन आठवड्यात डिटेक्ट करा अन्यथा डीबी पथकातून तुम्हाला हटविण्याचा विचार केला जाईल, असे एसपींनी स्पष्ट केले. गुन्ह्यांच्या तपासाबाबत मार्गदर्शन करताना अखिलेशकुमार सिंह यांनी सांगितले की, १५ वर्ष जुने गुन्हेगार रेकॉर्डवरून काढून टाका, त्याऐवजी नव्याने सक्रिय झालेले, अद्याप रेकॉर्डवर न आलेल्या गुन्हेगारांची नोंद घ्या, त्यांच्या मोडस आॅप्रेन्डी, नेटवर्क, पाठीराखे, आश्रयाची स्थाने याची माहिती काढा. अशा गुन्हेगारांना आर्थिक पाठबळ देणारे, त्यांच्या मालाची खरेदी करणारे, कठीण प्रसंगी त्यांच्या जामिनासाठी उभे राहणारे, राजकीय पक्षातील त्यांची उठबस, त्यांचे गॉडफादर यांच्यावर वॉच ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. डिटेक्शनसाठी एसपींनी दोन आठवड्यांचा अल्टीमेटम देऊन फेरबदलाचे सूतोवाच केल्याने डीबी स्कॉडमध्ये ठाण मांडून बसलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. जिल्ह्यात पाहिजे-फरारी आरोपींचा आकडा पाचशेच्या घरात आहे. या आरोपींचाही शोध घेण्याचे तसेच न्यायालयातून निघणाऱ्या वॉरंटची प्रामाणिकपणे तामिली करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. (जिल्हा प्रतिनिधी) सायबर कॅफे, सीमकार्ड विक्रेत्यांना अलर्ट सीसीटीव्ही कॅमेरांचा ‘वॉच’ का नाही ?४जिल्ह्यात घडलेल्या सायबर गुन्ह्यांचा यावेळी आढावा घेतला गेला. यावेळी सीमकार्ड विक्रेते व संबंधितांची बैठक घेऊन त्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. संपूर्ण कागदपत्रांची शहानिशा झाल्याशिवाय सीमकार्ड जारी करण्यात येऊ नये, अल्पवयीन मुलांना कार्ड देऊ नये, राज्याबाहेरील व्यक्तींना कार्ड देताना संपूर्ण खात्री घ्यावी, पूर्वी अ‍ॅक्टीव्ह झालेले सीमकार्ड पुन्हा विक्री केले जाऊ नये, कायदेशीरबाबींची संपूर्ण पूर्तता करावी, वेळोवेळी नोंदी ठेवाव्या, बाहेरील व्यक्तीचे लोकल कनेक्शन तपासावे, सायबर कॅफेमध्ये १८ वर्षाखालील मुलांना प्रवेश देऊ नये आदी सूचना यावेळी करण्यात आल्या. एसपींनी एटीएस, विशेष शाखा व स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनाही याबाबत सतर्क राहण्याचे निर्देश दिले. यवतमाळ शहरातच नव्हे तर जिल्ह्यात अनेक श्रीमंतांकडे चोरीच्या घटना घडल्या आहेत. अशा घटनांवर ‘वॉच’ ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे हा उत्तम पर्याय आहे. चोरटे व गुन्ह्याची पद्धत शोधताना यातील फुटेजचा पोलिसांचा मोठा आधार होतो. मात्र आतापर्यंत चोऱ्या झालेल्या अनेक श्रीमंतांकडे सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचे उघडकीस आले. लाखोंची रक्कम चोरी गेल्यानंतर पश्चाताप करण्याऐवजी आधीच सीसीटीव्ही कॅमेरांवरील खर्च सुरक्षेच्या दृष्टीने श्रीमंतांना सहज परवडणारा आहे. रॅगिंग, छेडखाणी या सारखे प्रकार रोखण्यासाठी शाळा-महाविद्यालयांनाही सीसीटीव्ही कॅमेरे वेगळी सुरक्षा प्रदान करू शकतात. गुन्ह्यांचा तपास करताना जिथे कुठे उपलब्ध आहे तेथे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याच्या सूचना देण्यात आल्या.