शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

अखेर विद्यार्थ्यांना मिळाले भोजन

By admin | Updated: September 18, 2014 23:41 IST

मेसचे कंत्राट संपल्याने गेल्या चार दिवसांपासून उपाशी असलेल्या विद्यार्थ्यांना गुरुवारी दिलासा मिळाला. ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच समाज कल्याण विभागाने कंत्राट देऊन विद्यार्थ्यांच्या भोजनाची

राळेगाव : मेसचे कंत्राट संपल्याने गेल्या चार दिवसांपासून उपाशी असलेल्या विद्यार्थ्यांना गुरुवारी दिलासा मिळाला. ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच समाज कल्याण विभागाने कंत्राट देऊन विद्यार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्था केली. राळेगाव येथील समाज कल्याण विभागांतर्गत मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या भोजनाचे कंत्राट १५ आॅगस्ट रोजी संपले होते. मात्र मानवतेच्या दृष्टीकोणातून कंत्राटदाराने काही दिवस त्यांना भोजन दिले. मात्र १३ सप्टेंबरपासून मेस बंद केली. परिणामी येथील २८ विद्यार्थ्यांवर उपाशी राहण्याची वेळ आली. वसतिगृह अधीक्षकांनी विद्यार्थ्यांना घरी जाण्याचा सल्ला दिला तर समाज कल्याण विभागाने उडवाउडवीची उत्तरे दिली होती. दरम्यान ‘लोकमत’ने या संदर्भात वृत्त प्रकाशित केले, आणि समाज कल्याण विभाग खडबडून जागा झाला. पूर्वीच्याच कंत्राटदाराला कंत्राट देऊन गुरुवारपासून या विद्यार्थ्यांची मेस सुरू केली. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गावी गेलेल्या विद्यार्थ्यांना अधीक्षकाने दूरध्वनी करून बोलावून घेतले. (प्रतिनिधी)