शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

अखेर कमलाबाईवर अंत्यसंस्कार

By admin | Updated: May 19, 2017 01:50 IST

एकुलत्या एका लेकीने व जावयाने झीडकारलेल्या कमलाबाईच्या पार्थिवावर अखेर गुरूवारी येथील मोक्षधामात

जावई, लेक दूरच : यवतमाळच्या समाज संघटनेने घेतली जबाबदारी लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : एकुलत्या एका लेकीने व जावयाने झीडकारलेल्या कमलाबाईच्या पार्थिवावर अखेर गुरूवारी येथील मोक्षधामात रितीरिवाजानुसार कलार समाज संघटनेने अंत्यसंस्कार केले. कळंब तालुक्यातील सावरगाव येथील मूळ रहिवासी असलेल्या कमलाबाईला एकुलती एक लेक. शिक्षक मुलगा बघून कमलाबाई व नानाजीने तिचा विवाह केला. वृद्धापकाळात नानाजी व कमलाबाई लेकीकडे राहायला गेले. काही वर्षांनी नानाजीचे निधन झाले. या दरम्यान जावई व लेकीने त्यांची २० एकर शेती विकून खाल्ली. त्यामुळे बेवारस स्थितीत नानाजीचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. नंतर कमलाबाईच्या नशिबी तोच भोग आला. जावई व लेकीने तिला घराबाहेर काढले. यावेळी तिला राळेगावच्या एका सुज्ञ नागरिकाने आश्रय दिला. दरम्यान, वृद्धापकाळामुळे कमलाबाईची प्रकृती खालावली. त्या सुज्ञ व्यक्तीने तिला येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असतानाच सोमवारी तिचा मृत्यू झाला. मात्र तिचे पार्थिव घेण्यासाठी लेक फिरकलीच नाही. ही करूण कहाणी गुरूवारी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच कलार समाज सघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते रूग्णालयात पोहोचले. त्यांनी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी दर्शविली. लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : एकुलत्या एका लेकीने व जावयाने झीडकारलेल्या कमलाबाईच्या पार्थिवावर अखेर गुरूवारी येथील मोक्षधामात रितीरिवाजानुसार कलार समाज संघटनेने अंत्यसंस्कार केले. कळंब तालुक्यातील सावरगाव येथील मूळ रहिवासी असलेल्या कमलाबाईला एकुलती एक लेक. शिक्षक मुलगा बघून कमलाबाई व नानाजीने तिचा विवाह केला. वृद्धापकाळात नानाजी व कमलाबाई लेकीकडे राहायला गेले. काही वर्षांनी नानाजीचे निधन झाले. या दरम्यान जावई व लेकीने त्यांची २० एकर शेती विकून खाल्ली. त्यामुळे बेवारस स्थितीत नानाजीचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. नंतर कमलाबाईच्या नशिबी तोच भोग आला. जावई व लेकीने तिला घराबाहेर काढले. यावेळी तिला राळेगावच्या एका सुज्ञ नागरिकाने आश्रय दिला. दरम्यान, वृद्धापकाळामुळे कमलाबाईची प्रकृती खालावली. त्या सुज्ञ व्यक्तीने तिला येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असतानाच सोमवारी तिचा मृत्यू झाला. मात्र तिचे पार्थिव घेण्यासाठी लेक फिरकलीच नाही. ही करूण कहाणी गुरूवारी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच कलार समाज सघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते रूग्णालयात पोहोचले. त्यांनी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी दर्शविली. कलाबाईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी राळेगावचे अरविंद वाढोणकर, बाळासाहेब कविश्वर यांनी तिच्या मृतदेहाची मागणी पोलीस आणि रूग्णालय प्रशासनानकडे केली. त्यांनी हिंदू रितीरिवाजानुसार अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घेतला होता. मात्र कलार समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अंत्यसंस्काराची जबाबदारी घेतल्याने मृतदेह त्यांच्या स्वाधीन करण्यात आला. अखेर समाज बांधवांच्या उपस्थितीत गुरूवारी येथील मोक्षधामात अंत्यसंस्कार पार पडले.