शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ‘वसंत’ भाडेतत्वावर देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 21:33 IST

विदर्भातील एकमेव सहकारी तत्वावर चालणारा पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखाना आर्थिक डबघाईमुळे अखेर भाडे तत्वावर देण्याचा निर्णय बुधवारी पुसद येथे झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

ठळक मुद्देसंचालक मंडळाचा निर्णय : कारखान्यावर ७० कोटींपेक्षा अधिक कर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : विदर्भातील एकमेव सहकारी तत्वावर चालणारा पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखाना आर्थिक डबघाईमुळे अखेर भाडे तत्वावर देण्याचा निर्णय बुधवारी पुसद येथे झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.वसंत सहकारी साखर कारखान्याची स्थापना माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी १९६९ साली केली होती. तेव्हापासून अविरत या कारखान्याचे गाळप सुरू आहे. परंतु गत काही वर्षांपासून कारखाना आर्थिक डबघाईस आला. गतवर्षी तर कारखान्याने निच्चांकी २५ हजार मेट्रिक गाळप झाले. यंदा तर अद्यापही गळीत हंगाम सुरू होण्याच्या हालचाली नाहीत. तसेच गत ३० महिन्यांपासून कामगारांच्या वेतनाचे आठ कोटी ६३ लाख रुपये थकीत आहे. कारखान्यावर बँकेचे ३४ कोटी, शासकीय भरणा १० कोटी असे मिळून ७० हजारांपेक्षा अधिक कर्ज आहे. शासनाने थकहमी घेतली नाही. तसेच जिल्हा बँकेनेही पैसे दिले नाही. त्यामुळे कारखाना सुरू झालाच नाही. कारखान्याच्या संदर्भात पुसद येथील विश्रामगृहावर बुधवारी बैठक घेण्यात आली. कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. माधवराव माने यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. बैठकीत सर्वानुमते कारखाना भाडे तत्वावर देण्याचे ठरविण्यात आल्याची माहिती अध्यक्ष अ‍ॅड. माधवराव माने यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.बैठकीला कारखान्याचे उपाध्यक्ष कृष्णा पाटील देवसरकर, चितांगराव कदम, विलासराव मोरे, रमण रावते, आनंदराव चिकणे, रतीराव राऊत, प्रदीप देशमुख, विजय जाधव, सुभाष जाधव, कल्याणराव माने आदी उपस्थित होते.