शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याची अंतिम पैसेवारी ४७ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 22:46 IST

अपुरा पाऊस आणि बोंडअळीच्या आक्रमणाने जिल्ह्यावर दुष्काळाचे संकट घोंगावत होते. अखेर या दुष्काळावर जिल्हा प्रशासनाने शिक्कामोर्तब केले असून जिल्ह्याची अंतिम पैसेवारी ४७ टक्के घोषित करण्यात आली आहे.

ठळक मुद्देदुष्काळ : अपुरा पाऊस व बोंडअळीचे आक्रमण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अपुरा पाऊस आणि बोंडअळीच्या आक्रमणाने जिल्ह्यावर दुष्काळाचे संकट घोंगावत होते. अखेर या दुष्काळावर जिल्हा प्रशासनाने शिक्कामोर्तब केले असून जिल्ह्याची अंतिम पैसेवारी ४७ टक्के घोषित करण्यात आली आहे. या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.यवतमाळ जिल्ह्यात खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच दुष्काळाचे सावट होते. यंदा अपुरा पाऊस झाल्याने त्याचा खरिपावर मोठा परिणाम झाला तर बोंडअळीने संपूर्ण कपाशीचा हंगाम उद्ध्वस्त केला. अशा स्थितीत शासनाने सुरुवातीला सुधारित आणेवारी ५६ टक्के घोषित केली होती. यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. त्यामुळे सर्वांच्या नजरा अंतिम आणेवारीकडे लक्ष लागले होते. जिल्हा प्रशासनाने ३१ डिसेंबर रोजी जिल्ह्याची अंतिम पैसेवारी घोषित केली. त्यात १६ तालुक्यातील २१५८ गावांपैकी २०४९ गावांची पैसेवारी ४७ घोषित केली आहे. या अंतिम पैसेवारीने जिल्ह्यातील दुष्काळावर शिक्कामोर्तब केले आहे.आर्णी तालुक्याची सर्वात कमी म्हणजे ४४ पैसेवारी घोषित करण्यात आली. तर यवतमाळ ४५, कळंब, बाभूळगाव, दारव्हा, नेर, उमरखेड, महागाव, घाटंजी, मारेगाव, झरीजामणी या तालुक्यांची अंतिम पैसेवारी ४७ तर दिग्रस, पुसद, केळापूर, राळेगाव, वणी या तालुक्यांची पैसेवारी ४६ घोषित करण्यात आली आहे.असा मिळणार शेतकऱ्यांना लाभजिल्ह्याची पैसेवारी ४७ टक्के जाहीर झाली आहे. ५० टक्केच्या आत पैसेवारी जाहीर झाली तर दुष्काळी परिस्थिती मानली जाते. दुष्काळ निवारण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने काही निकष जाहीर केले. त्यानुसार जिल्ह्याला लाभ मिळणार आहे. त्यात कर्जवसुली थांबविणे, कर्जाचे पुनर्गठन करणे, एनडीआरएफच्या निकषानुसार दुष्काळी भागात कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी ६८०० तर ओलिताच्या क्षेत्रासाठी १३ हजार ५०० रुपये मदत देणे, कृषी पंपाच्या वीज बिलात ३३ टक्के कपात, महसुली शेतसारा माफ, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ, चारा छावण्या उघडणे आदी प्रमुख बाबींचा समावेश आहे.सलग चौथ्या वर्षी दुष्काळजिल्ह्यात सलग चौथ्या वर्षी दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. २०१४ पासून सलग तीन वर्ष जिल्ह्याची पैसेवारी ५० टक्केच्या खाली आहे. यंदाही पुन्हा पैसेवारी ४७ टक्के निघाली आहे. अशा भयावह स्थितीत शेतकरी मदतीची आस लावून बसले आहे.