शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
4
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
5
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
6
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
7
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
8
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
9
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
10
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
11
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
12
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
13
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
14
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
15
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
16
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
17
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
18
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
19
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
20
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!

दोन चिमुकल्यांसह मातेची तासभर मृत्यूशी झुंज

By admin | Updated: June 20, 2015 00:12 IST

पावसामुळे कोसळलेल्या घराच्या मलब्यात दोन चिमुकल्यांसह माता दबल्या गेली.

 उमरखेडची घटना : पावसाने कोसळलेल्या घरात दबलेल्यांना नागरिकांनी सुखरुप काढले उमरखेड : पावसामुळे कोसळलेल्या घराच्या मलब्यात दोन चिमुकल्यांसह माता दबल्या गेली. नागरिकांच्या हा प्रकार लक्षात येताच तासभराच्या प्रयत्नानंतर तिघींनाही बाहेर काढले. ही घटना उमरखेड येथील इंदिरानगरात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली. यात जखमी झालेल्या तिघींवर नांदेडच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.शहरातील महागाव मार्गावरील इंदिरानगरमध्ये बाबूशा काळबांडे यांचे घर आहे. गुरुवारी सायंकाळी आलेल्या वादळी पावसात त्यांचे घर जमीनदोस्त झाले. यावेळी घरात असलेली त्यांची पत्नी वर्षा बाबूशा काळबांडे, मुलगी अनुसरा आणि विद्या या तिघी मायलेकी घराच्या मलब्याखाली दबल्या. त्याच वेळी त्यांची आई कौशल्या काळबांडे सुदैवाने बाहेर होत्या. त्यांनी आरडाओरडा करीत नागरिकांना मदतीसाठी बोलाविले. विलास चव्हाण, सतीश कोल्हे, शेख निसार यांनी नागरिकांच्या मदतीने अख्खा ढिगारा उपसून या तिघींनाही बाहेर काढले. यावेळी मदत मिळाली नसती तर मोठा अनुचित प्रकार घडला असता. या तिघींनाही जखमी अवस्थेत उमरखेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. जबर मार असल्याने नांदेड येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले. कोसळलेल्या घरात आपल्या दोन चिमुकल्यांसह मातेने तासभर निकराची झुंज दिली. नागरिकांनी या तिघींना सुखरुप बाहेर काढले. तेव्हा सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार सचिन शेजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी प्रकाश माने यांनी घराचा पंचनामा केला. सध्या बेघर झालेल्या काळबांंडे परिवाराला शासनाच्या मदतीची आशा आहे. (शहर प्रतिनिधी)