शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पांढुर्णा येथे पाण्यासाठी एकजुटीने लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 22:27 IST

पावसाचे पाणी अडवून भविष्यातील पाणी संकटावर मात करण्यासाठी व दुष्काळासोबत लढा देण्याकरिता एकजूट झालेल्या पांढुर्णा खुर्द येथील ग्रामस्थांच्या लढ्यात आमदार राजू तोडसामही सहभागी झाले. त्यांनी गावकऱ्यांसोबत महाश्रमदान केले.

ठळक मुद्देआमदारांची उपस्थिती : दुष्काळासोबतच्या लढ्यात अधिकारी, कर्मचारी, गावकरी सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : पावसाचे पाणी अडवून भविष्यातील पाणी संकटावर मात करण्यासाठी व दुष्काळासोबत लढा देण्याकरिता एकजूट झालेल्या पांढुर्णा खुर्द येथील ग्रामस्थांच्या लढ्यात आमदार राजू तोडसामही सहभागी झाले. त्यांनी गावकऱ्यांसोबत महाश्रमदान केले.श्रमदानात प्रत्येकाने सहभागी होऊन खारीचा वाटा उचलावा, याकरिता महाराष्ट्र दिनी पाणी फाउंडेशनतर्फे सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेअंतर्गत महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले होते. जल व मृदा संधारणाच्या या चळवळीला अधिक गती प्राप्त होऊन दुष्काळाशी लढण्यासाठी ग्रामस्थांना प्रेरणा मिळावी म्हणून आमदार राजू तोडसाम यांनीही सहकाऱ्यांसह महाश्रमदानात भाग घेतला.श्रमदानात गटशिक्षणाधिकारी मनू पखाले, शिक्षण विस्तार अधिकारी साधना चौधरी व सहकारी कर्मचारी, विकासगंगा संस्थेचे अध्यक्ष रंजित बोबडे, सुभाष मानकर, प्रशांत उगले, मोरेश्वर वातीले, अनुप लोणकर, अमित गाडबैल, आकाश बुरेवार आदींसह नागरिकांनी सहभाग घेतला. उपस्थितांनी कंपार्टमेंट बंडीग व सलग समतल चर तयार केले. जलसंधारणासाठी गावात मोठ्या प्रमाणात बांध-बंदिस्ती, शेततळे, माती नाला बांध, दगडी बांध, सलग समतल चर तयार करणे सुरू आहे. गावकºयांना मुबलक प्रमाणात जलसाठा उपलब्ध होण्यासाठी टाटा ट्रस्टच्या सहकार्याने विकासगंगा संस्थेद्वारा गावात तलावाचे खोदकाम सुरू आहे.दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी शासकीय यंत्रणांकडून पाठिंबा मिळत असून शासकीय व निमशासकीय पदाधिकारी, कर्मचारी, शिक्षक, पत्रकार, कुंभारी व घाटंजी येथील नागरिकांनी श्रमदानात सहभाग घेत गावकºयांचा उत्साह वाढविला. 

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धा