शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
2
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
5
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
6
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
7
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
8
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
9
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
10
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
11
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
12
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
13
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
14
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
15
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
16
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
17
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
18
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
19
रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना
20
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य

कर्तव्याशी प्रामाणिक राहून हक्कांसाठी लढा

By admin | Updated: July 22, 2015 00:22 IST

महिला कामगारांनी आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ व प्रामाणिक राहून आपल्या हक्कांसाठी लढा द्यावा.

यवतमाळ : महिला कामगारांनी आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ व प्रामाणिक राहून आपल्या हक्कांसाठी लढा द्यावा. समर्थपणे कामगार संघटनांशी एकनिष्ठ राहून महिलाशक्ती दाखवून द्यावी. आपण सदैव संघटनेच्या पाठीशी राहू, अशी ग्वाही एसटी कामगार संघटनेच्या राज्य महिला संघटक शिला नाईकवाडे यांनी दिली.एसटी कामगार संघटना व इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट वर्कर्स फेडरेशनच्या वतीने महिला कामगार मेळावा जेसीआय भवनात उत्साहात पार पडला. त्यावेळी त्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कामगार संघटनेचे विभागीय सचिव सदाशिव शिवणकर होते. प्रमुख अतिथी एसटी बँक संचालक प्रवीण बोनगीनवार उपस्थित होते. विभागीय सचिव सदाशिव शिवणकर म्हणाले की, कामगारांच्या हक्कांसाठी लढा देऊ . महिलांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सदैव तत्पर राहू व अग्रक्रमाने तक्रारींची सोडवणूक करण्याची ग्वाही शिवणकर यांनी दिली. या मेळाव्यात उपस्थित महिलांनी तक्रारींचा पाढाच वाचला. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात एसटी कामगार महिला मेळावा झाल्याचे बोलले जात आहे. यावेळी प्रमोदिनी किनाके यांनीही विचार मांडले. अकोला येथील सविता नागवंशी, शबनम खान, प्रमिला गेडाम, उषा ताथोड, माया कंगाले, कल्पना निकोसे, सुवर्णा मारकडे, प्रिती पाटील, स्वाती भोयर, सत्यभामा गादेकर, सुरेखा मंडाले, कोमल भोयर, सुचिता शेंद्रे, रत्नमाला गायकवाड, लक्ष्मी निमसरकर, माधुरी राजगुरे, जया नागरिकर, गंगाबाई जयकुंडे, रुपाली अपराजित, विभा मासाळ, वनिता मैसाळे, रुखमा मानवटकर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रादेशिक महिला संघटक रंजुषा किरणपुरे यांनी केले. तर राजश्री नेवारे यांनी आभार मानले.मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी एसटी कामगार संघटना व इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट वर्कर्स फेडरेशनचे पदाधिकारी आणि सदस्यांनी पुढाकार घेतला. (वार्ताहर)