शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
3
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
4
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
5
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
6
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
7
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
8
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
9
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
10
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
11
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
12
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
13
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
14
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
15
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
16
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
17
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
18
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
19
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
20
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...

सर्वच पक्षांचा उडाला गोंधळ

By admin | Updated: February 2, 2017 00:17 IST

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांवरून नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सर्व पक्षांमध्ये गोंधळ उडाला.

ऐनवेळी उमेदवार बदलविले : पुसदमध्ये भलत्यालाच एबी फॉर्म यवतमाळ : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांवरून नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सर्व पक्षांमध्ये गोंधळ उडाला. पूर्वी घोषित केलेले उमेदवार बदलवून ऐनवेळी काही पक्षांनी भलत्यालाच एबी फॉर्म दिल्याने सर्वत्र गोंधळाची स्थिती निर्माण झाली. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याचा बुधवार हा शेवटचा दिवस होता. शेवटपर्यंत कोणत्याच पक्षाने उमेदवारांची अधिकृत घोषणा केली नाही. तथापि काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीने काही इच्छुकांना कामाला लागण्याचे आदेश दिले होते. मंगळवारी काही गट व गणांचे उमेदवारही निश्चित झाले होते. मात्र मंगळवारी रात्रीतून सर्वच पक्षांच्या यादीत अचानक बदल सुरू झाले. काही ठिकाणी आधीचे उमेदवार बदलवून नवीन इच्छुकांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला. त्यामुळे सर्वच पक्षांच्या याद्या रात्रीतून बदलल्या. बुधवारी सकाळपासून बदलाचे वारे वाहू लागल्याने सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. नेमकी उमेदवारी कुणाला मिळाली, हे बराच वेळ कार्यकर्त्यांना कळलेच नाही. विशेषत: पुसद तालुक्यातील उमेदवारीवरून काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेत प्रचंड गोंधळ सुरू होता. नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत या पक्षांचे उमेदवार बदलविण्यात आले. त्यामुळे सर्वच गोंधळात पडले होते. एकदाची यादी अंतिम झाल्यानंतर संभ्रमाची स्थिती नष्ट झाली. तोपर्यंत सर्वच पक्षांत गोंधळ सुरू होता. पुसदच्या याद्या रखडल्या काँग्रेस, शिवसेना व भाजपाची पुसद तालुक्यातील उमेदवारांची अंतिम यादी शेवटपर्यंत रखडून होती. या तीनही पक्षांनी यादीत अनेकदा बदल केले. एकदा टाकलेले नाव खोडून पुन्हा तेथे नवीन नाव लिहिले गेले. नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे दुपारी ३ वाजतापर्यंत या पक्षांच्या याद्या सतत बदलत राहिल्या. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. ऐनवेळी छावणी बदलली काँग्रेसच्या काही तालुक्यातील इच्छुकांना ऐनवेळी भाजपाने उमेदवारी बहाल केली. काँग्रेसनेही ऐनवेळी उमेदवार बदलले. शिवसेनेही तगडे उमेदवार देण्यासाठी काही तालुक्यात शेवटपर्यंत फेरबदल केले. राष्ट्रवादीची सर्व मदार पुसदवर आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने पुसद, उमरखेड व महागाव तालुक्यातील उमेदवार निश्चित केल्यानंतरच इतर तीनही पक्षांनी उमेदवारांची निश्चिती केली. परिणामी पुसद विभागात शेवटपर्यंत गोंधळाची स्थिती होती. (शहर प्रतिनिधी) जि.प.चे ५३९ तर पं.स.चे ९३३ उमेदवार जिल्हा परिषदेच्या ५५ गटांसाठी एकूण ५३९ तर १६ पंचायत समित्यांसाठी एकूण ९३३ उमेदवारांनी नामांकन दाखल केले. नामांकनाच्या अखेरच्या दिवशी तहसील कार्यालयात एकच गर्दी उसळली होती. सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी बुधवारी अर्ज दाखल केल्याने प्रशासकीय यंत्रणाही भांबावून गेली होती. एकाचवेळी गर्दी झाल्याने तहसीलमध्ये प्रचंड गोंधळाची स्थिती होती. उमेदवारांचे समर्थक मोठ्या प्रमाणात गोळा झाल्याने तहसील कार्यालयाला अक्षरश: जत्रेचे स्वरूप आले होते. गोधणी, पांढरकवडा, बसस्थानक चौक, आदी मार्गावर वाहनांची लांब रांग लागली होती. कार्यकर्ते गटागटाने आपल्या उमेदवारांच्या समर्थनार्थ गर्दी करीत होते.