शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

मर्जीतील अधिकाऱ्यांसाठी जिल्ह्यातून फिल्डिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2022 21:50 IST

गुन्हेगारी टोळ्यांपासून माफियांपर्यंत सर्वांनाच सोईचे प्रशासन हवे आहे. महसुलापेक्षा पोलीस खात्यात कमांड असली तर अडचणी होत नाही, याचा अनुभव आला आहे. दोन वर्षांच्या कालावधीत अनेकांना पोलीस कारवाईमुळे तोंडघशी पडावे लागले. आता गमावलेली प्रतिमा पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. अपर अधीक्षक पदावर आपल्या मर्जीतील अधिकारी बसवायचा व अधीक्षक हा रबरी शिक्का राहावा याची व्यवस्था केली जात आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात सत्ता कोणत्याही पक्षाची असो, त्या सत्तेचा अप्रत्यक्ष लाभ येथील भूमाफिया, क्रिकेट बुकी व रेती माफियांनी घेतला आहे. मागील अडीच वर्षांच्या काळात पोलीस व महसुलात उच्च पदस्थ अधिकारी या लॉबीसाठी अडचणीचे ठरले. आता मात्र आपल्या मर्जीतीलच प्रशासन जिल्ह्यात असावे, अशी व्यूहरचना आखली जात आहे. प्राधान्याने पोलीस दलात वरचष्मा राहावा याकरिता शिफारसी पोहोचविल्या जात आहेत. जिल्हा पोलीस दलाचा प्रमुख नामधारी असावा व कार्यकारी अधिकारी आपल्या मर्जीतील रहावा याचे नियोजन केले जात आहे. यासाठी वाटेत ती रक्कम मोजण्याची तयारी आहे. शिवाय स्थानिक नेत्याचे राजकीय शिफारस पत्रही वापरले जात आहे. दोन वर्षांपूर्वी पोलीस निरीक्षकाच्या हातात संपूर्ण दलाचा कारभार होता. कोण कुठे जाणार-येणार यावर थेट नियंत्रण होते. आता राज्यातील सत्ताबदलात पुन्हा ती लॉबी सक्रिय झाली आहे. गुन्हेगारी टोळ्यांपासून माफियांपर्यंत सर्वांनाच सोईचे प्रशासन हवे आहे. महसुलापेक्षा पोलीस खात्यात कमांड असली तर अडचणी होत नाही, याचा अनुभव आला आहे. दोन वर्षांच्या कालावधीत अनेकांना पोलीस कारवाईमुळे तोंडघशी पडावे लागले. आता गमावलेली प्रतिमा पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. अपर अधीक्षक पदावर आपल्या मर्जीतील अधिकारी बसवायचा व अधीक्षक हा रबरी शिक्का राहावा याची व्यवस्था केली जात आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या कधी होतील, हे अजून निश्चित नाही. साधारणत: नोव्हेंबरअखेर बदली मुहूर्त निघेल, असे मानले जात आहे. त्यानुसारच आतापासून पदोन्नतीवर सोईचा अधिकारी आणण्याचा डाव रचण्यात आला आहे. त्यानुसार क्रीम पोस्टिंगसाठीसुद्धा ठाणेदार, दुय्यम अधिकारी, जमादार, शिपाई आपल्या स्तरावर तयारीला लागले  आहेत. 

माफियांच्या पैशावर राजकारण्यांची चलती - जिल्ह्यात काही अपवाद वगळता माफियांच्या पैशावरच येथील राजकारणी टिकून आहेत. यवतमाळ शहरही याला अपवाद नाही. क्रिकेट बुकी, भूखंड माफिया, रेतीमाफिया यांचा पैसाच निवडणूक काळात विजयाचे गणित निश्चित करीत आला आहे. त्यामुळे या तीनही लॉबींची अडचण होईल, असे प्रशासन जिल्ह्यात येऊ नये याचा पुरेपूर प्रयत्न काही नेतेमंडळी करीत आहे. आता त्याला कितपत यश येते याकडे लक्ष लागले आहे. 

उपमुख्यमंत्र्यांचा आदेश जिल्ह्यात अमलात येईल का ?- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर कार्यक्रमात रेती माफियांवर कडक कारवाईचे निर्देश दिले. इतकेच नव्हे तर रेती लिलावासंदर्भात नवीन धोरण आणले जाईल, असे सांगितले. रेतीच्या तस्करीतून गुन्हेगार बळकट झाल्याचे त्यांनी बोलून दाखविले. ही वस्तुस्थिती यवतमाळ जिल्ह्यातही आहे. येथील रेती माफिया व राजकीय मंडळी एकाच माळेची मनी आहेत. ही माळ तोडण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी दिलेला आदेश जिल्ह्यात अमलात आणला जाईल का याबाबत जनसामान्यांमध्ये साशंकता आहे.

 

टॅग्स :mafiaमाफियाPoliceपोलिस