शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
2
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
3
पाकच्या नापाक कारवाया थांबेनात; आयएसआयने हेरगिरी करण्यासाठी निवडला नेपाळचा रस्ता! काय केलं बघाच...
4
अद्भूत आणि जादूई! रणबीर कपूरच्या 'रामायण' सिनेमाची पहिली झलक, डोळ्यांचं पारणं फेडणारा टीझर
5
सोशल मीडियावर एक पोस्ट आणि गेली २२ लाखांची नोकरी, कंपनीच्या मालकांनी स्वतः सांगितलं कारण
6
Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...
7
लाखो रुपयांचा IT जॉब सोडून जोडप्याचा शेती करण्याचा निर्णय; आज १ कोटींची उलाढाल; नेमकं काय करतात?
8
बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना! टिन शेड कोसळल्याने एका भाविकाचा मृत्यू, ८ जण जखमी
9
Chaturmas 2025: चतुर्मासात करा 'हा' संकल्प आणि व्यक्तिमत्त्वाला द्या नवीन आकार!
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
11
इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
12
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
13
"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
14
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
15
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
16
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
17
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
18
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...
19
४ महिन्यांत ६० रुपयांवरून २५२ वर आला 'हा' शेअर; गुंतवणूकदार मालामाल, तुमच्याकडे आहे का?
20
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...

विनातिकीट प्रवासी आढळताच महिला वाहक बेशुद्ध

By admin | Updated: September 25, 2015 03:10 IST

सायंकाळी ७ वाजताची वेळ. पुलगाववरून आलेली एसटी बस बसस्थानकात थांबली. तेवढ्यात तपासणी पथकाचे वाहन आले.

बाभूळगाव बसस्थानक : एसटीसह तपासणी पथक रुग्णालयात आरिफ अली  बाभूळगाव सायंकाळी ७ वाजताची वेळ. पुलगाववरून आलेली एसटी बस बसस्थानकात थांबली. तेवढ्यात तपासणी पथकाचे वाहन आले. प्रवाशांची तपासणी सुरू असताना पाच जण विनातिकीट आढळले. महिला वाहकाला जाब विचारणार तोच ती बेशुद्ध होऊन पडली. तपासणीचे काम सोडून एसटीसह तपासणी पथक थेट बाभूळगावच्या ग्रामीण रुग्णालयात पोहोचली. या घटनेची चर्चा संपूर्ण शहरभर झाल्याने रुग्णालयातही बघ्यांची गर्दी झाली. पुलगाववरून यवतमाळकडे प्रवासी घेऊन निघालेली एसटी बस बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास बाभूळगाव बसस्थानकावर आली. त्याच वेळी एसटीचे तपासणी पथक टाटासुमो वाहनातून पोहोचले. एसटीतील प्रवाशांची तपासणी सुरू झाली. त्या दरम्यान पाच जण विनातिकीट आढळले. याबाबत महिला वाहकाला जाब विचारणार तोच ती बेशुद्ध पडली. पथकातील अधिकाऱ्यांची पाचावर धारण बसली. बससह तपासणी पथक थेट बाभूळगावच्या ग्रामीण रुग्णालयात पोहोचले. बस आणि टाटासुमो रुग्णालयात आल्याने नागरिकांची गर्दी झाली. महिला वाहकावर तत्काळ उपचार सुरू झाले. काही वेळानंतर डॉक्टरांनी यवतमाळला जाण्याचा सल्ला दिला. महिला वाहकाला यवतमाळला घेऊन जाण्याची तयारी सुरू असताना तपासणी पथक मात्र चालकाचे बयान घेण्यात व्यस्त होते. बयाण आटोपल्यानंतर उपचारासाठी यवतमाळला रवाना करण्यात आले. बसमध्ये विनातिकीट प्रवासी आढळल्यास त्याचा ठपका वाहकावर ठेऊन त्याच्यावर कारवाई केली जाते. त्यामुळे विधवा असलेली ही महिला वाहक घाबरली असावी आणि कारवाईच्या भीतीने बेशुद्ध पडली असावी. मात्र या घटनेची चर्चा सध्या चांगलीच रंगत आहे.