पुसद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी दिलीप बोंद्रे पाटील यांची नियुक्ती झाल्याबद्दल पुसद अर्बन बँकेच्या पुढाकाराने त्यांचा शनिवारी सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष शरद मैंद होते.प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मोहंमद नदीम, दीपक जाधव, विनायक डुबेवार, बंडू राऊत, रियासत अली, सुशांत महल्ले, प्रकाश पानपट्टे, यशवंत चौधरी, नितीन पवार, शरद पवार, साहेबराव ठेंगे, अशोक उंटवार, राजू दुधे, किरण वानरे, शेख कय्युम, अरुण ठाकरे, नाना जळगावकर, भगवान आसोले, शशीकांत जामगडे, ज्ञानेश्वर शिंदे, भवरसिंह सिसोदिया, सचिन शेबे उपस्थित होते. यावेळी दिलीप बेंद्रे यांचा शाल व श्रीफळ देऊन शरद मैंद यांनी सत्कार केला. (प्रतिनिधी)
पुसद बाजार समितीच्या नवनिर्वाचित सभापतीचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2015 02:30 IST