शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

बापाने मुलाला मारहाण करून विहिरीत फेकले

By admin | Updated: November 17, 2015 04:02 IST

दारू पिऊन त्रस्त करणाऱ्या मुलाला वडिलांनी दुसऱ्या मुलाच्या मदतीने बेदम मारहाण करून विहिरीत फेकून जीवे

झाडगाव : दारू पिऊन त्रस्त करणाऱ्या मुलाला वडिलांनी दुसऱ्या मुलाच्या मदतीने बेदम मारहाण करून विहिरीत फेकून जीवे मारल्याची घटना राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथे रविवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास घडली. आईने दिलेल्या तक्रारीवरून वडील आणि मुलाला राळेगाव पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. किरण रमेश चौधरी (२७) रा. झाडगाव असे मृत तरुणाचे नाव आहे. तर वडील रमेश पांडुरंग चौधरी (५५) आणि मुलगा नीलेश रमेश चौधरी (२२) अशी आरोपींची नावे आहे. किरणला गेल्या काही दिवसांपासून दारूचे व्यसन जडले होते. तो दारू पिऊन घरच्यांना त्रास देत होता. मक्त्याने केलेल्या शेतातील आलेला कापूस किरणने रविवारी सकाळी विकला. या पैशातून दारू पिऊन तो घरी आला. हा प्रकार वडिलांंना माहीत होताच त्यांनी किरण सोबत वाद घातला. त्याला बेदम मारहाण केली. आई रेखाबाईने वाद सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र रमेश ऐकत नव्हता. शेवटी सर्वात लहान मुलगा प्रवीणला घेऊन जवळच असलेल्या रावेरी येथे आपल्या भावाला बोलाविण्यासाठी ती गेली. दरम्यान इकडे बेशुद्ध पडलेल्या किरणाला रमेश आणि मुलगा नीलेशने उचलून गावाशेजारील अनिल केवटे यांच्या विहिरीत नेऊन टाकले. रेखा आपल्या भावाला घेऊन झाडगाव येथे आली असता तिला किरण दिसला नाही. तिने मुलगा नीलेशला विचारले असता मारहाणीनंतर किरणला विहिरीत फेकल्याचे सांगितले. हा प्रकार माहीत होताच तिने एकच हंबरडा फोडला. भावाच्या मदतीने राळेगाव गाठून पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी रमेश आणि मुलगा नीलेश या दोघांना रात्रीच अटक केली. किरणला मारहाण करुन विहिरीत फेकल्याची कबुली या बापलेकांनी पोलिसांपुढे दिली. सोमवारी सकाळी पोलिसांनी विहिरीतून किरणचा मृतदेह बाहेर काढला. किरणच्या डोक्याला जबर मार लागलेला होता. तसेच नाका-तोंडातून रक्त येत होते. राळेगाव येथे शवविच्छेदन केल्यानंतर सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेचा अधिक तपास ठाणेदार भारत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सोळंकी, जमादार वादाफळे व शिपाई निखील खडतकर करीत आहे. (वार्ताहर)