शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मटका धाडीत वृद्धाचा मृत्यू

By admin | Updated: January 28, 2015 23:40 IST

पोलिसांनी एका वरळी मटका अड्ड्यावर धाड घातली. मटका अड्डा चालक पसार झाला. त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले तर, एका वृद्धाशी घटनास्थळी धक्काबुक्की झाली.

फौजदाराला ठाण्यात मारहाण : पोलिसांची कारवाई संशयाच्या भोवऱ्यातयवतमाळ : पोलिसांनी एका वरळी मटका अड्ड्यावर धाड घातली. मटका अड्डा चालक पसार झाला. त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले तर, एका वृद्धाशी घटनास्थळी धक्काबुक्की झाली. त्यावेळी या वृद्धाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. दरम्यान, येथील शासकीय रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर या वृद्धाच्या संतप्त मुलाने शहर पोलीस ठाणे गाठले. तसेच गुन्हे शोध पथकाच्या खोलीतच धाड घालणाऱ्या फौजदाराला बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. घटनेनंतर पोलिसांनी याबाबत कमालीची गोपनियता ठेवली. त्यामुळे कारवाईबाबत संशय व्यक्त होत आहे. सुरेश (प्रकाश) शेटे (६५) रा. संभाजीनगर, असे मृताचे नाव आहे. त्याचा मुलगा संभाजीनगर परिसरात अवैध मटका अड्डा चालवित असल्याची गोपनिय माहिती शहर ठाणेदार दिलीप चव्हाण यांना मिळाली होती. त्यांनी गुन्हे शोध पथकाचे फौजदार संतोष मनवर यांना सदर मटका अड्ड्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यावरून पथकाने दुपारी ३ वाजताच्या सुमारास तेथे धाड घातली. यावेळी मटका अड्डा चालक घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी झाला. मात्र पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. यावेळी तेथे सुरेश शेटे होते. त्यांना पोलिसांनी शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर सुरेश शेटे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामुळे ते खाली कोसळले. ही बाब लक्षात येताच त्यांचे नातेवाईकांनी आणि स्थानिक नागरिकांनी त्यांना येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ नेले. यावेळी डॉक्टरांनी चाचपणी करून सुरेश शेटे यांना मृत घोषित केले. वडिलांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच त्यांच्या मुलाने शहर पोलीस ठाणे गाठले. ठाण्याच्या आवारातील गुन्हे शोध पथकाच्या कार्यालयात बसून असलेले फौजदार मनवर यांच्यावर पित्याच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप त्याने केला. तसेच त्यांना मारहाणही केली. हे पाहून पोलीस कर्मचारी धावून आले. त्यांनी सदर तरुणाला मारहाण केली. त्यानंतर मात्र झटापटीत संधी साधून तो पसार झाल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी कारवाईत व्यस्त असल्याचे आणि आरोपींची नावे माहीत नसल्याचे सांगून बोलण्याचे टाळले. पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्याकडूनही प्रतिसादाअभावी माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. मात्र कुणाच्याही अटकेबाबत पोलिसांनी दुजोरा दिला नाही. (स्थानिक प्रतिनिधी)