शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

धनगर आरक्षणासाठी तीव्र आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 21:31 IST

धनगर आरक्षण न दिल्यास १३ आॅगस्टपासून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा धनगर समाज संघर्ष समितीने दिला आहे. याबाबत सोमवारी जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देप्रशासनाला निवेदन : धनगर समाज संघर्ष समितीचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : धनगर आरक्षण न दिल्यास १३ आॅगस्टपासून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा धनगर समाज संघर्ष समितीने दिला आहे. याबाबत सोमवारी जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.भाजपा सरकारने सत्तेत येण्यापूर्वी धनगर समाजाला तत्काळ आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी आश्वासन पाळले नाही. धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणीसाठी राज्यशासनाला १२ आॅगस्टपर्यंत मुदत दिली आहे. यानंतर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.यासोबतच धनगर बांधवांना चराई पास देण्यात यावी, धनगर आरक्षणासाठी शहीद झालेल्या परमेश्वर घोंगडे आणि सतीश होळकर यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात यावी. कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी मिळावी आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी धनगर समाजबांधवांनी शासनाच्या धोरणाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. दिलेले आश्वासन सरकारकडून पाळले जात नसल्याचा आरोप करण्यात आला. आरक्षणाविषयीसुद्धा शासन चार वर्षांपासून केवळ आश्वासन देत असल्याचे समितीने म्हटले आहे.निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष अविनाश जानकर, कार्याध्यक्ष रमेश जारंडे, सचिव विठ्ठल बुच्चे, उपाध्यक्ष दीपक पुनसे, कोषाध्यक्ष संदीप पुनसे, पांडुरंग खांदवे, डॉ. संदीप धवने, संजय शिंदे पाटील, श्रीधर मोहड, बाळासाहेब शिंदे, कृष्णराव कांबळे उपस्थित होते.