शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
2
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
3
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
4
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
5
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
6
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
7
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
8
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
9
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
10
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
11
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
12
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
13
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
15
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
17
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
18
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
19
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
20
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार

पाणीटंचाईत शेतशिवारांचा आधार

By admin | Updated: April 25, 2016 02:15 IST

तालुक्यातील माळपठार भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून गावकऱ्यांना शेतशिवारातील विहिरी आणि हातपंपांचा आधार घ्यावा लागत आहे.

बेलोरात भीषण स्थिती : विहिरी व हातपंपांनी तळ गाठला पुसद : तालुक्यातील माळपठार भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून गावकऱ्यांना शेतशिवारातील विहिरी आणि हातपंपांचा आधार घ्यावा लागत आहे. बेलोरा आणि रामपूरनगर येथे निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नागरिक डोक्यावर हंडे घेऊन शिवाराची वाट धरत आहे. पुसद तालुक्याचे वाळवंट म्हणून माळपठार भाग ओळखला जातो. या भागातील बेलोरा येथे गत काही दिवसांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे या परिसरात ४० गाव माळपठार प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे. परंतु या योजनेलाही अखेरची घरघर लागली आहे. या योजनेचे आठ दिवस आड तेही अपुरे पाणी मिळत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. गावातील विहिरींनी तळ गाठल्याने गावानजीकच्या शेतात पाण्यासाठी जावे लागते. तसेच वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी तासन्तास शेतात थांबावे लागते. रात्री-बेरात्री शेतात जावे लागत आहे. शेतकऱ्याच्या मर्जीनुसार पाणी मिळवावे लागते. नाईलाज असल्याने नागरिक या शेतांमधील विहिरी व हातपंपावर जाऊन शेतमालकाची विणवणी करून पाणी भरताना दिसतात. प्रादेशिक पाणी पुरवठा योजना पूर्णत्वाने कार्यान्वित करून या योजनेच्या पाईपलाईनला लागलेली गळती रोखल्यास नागरिकांना दोन दिवसाआड पाणी मिळू शकते. परंतु जीवन प्राधिकरणाचे अधिकारी लक्ष देत नसल्याने या भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)