शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

शेती ठेक्याने देण्याकडे कल

By admin | Updated: May 21, 2016 02:25 IST

कृषिप्रधान समजल्या जाणाऱ्या देशात आता शेतकरीच पराधीन झाले असून शेती व्यवसाय बिनभरवशाचा बनला आहे.

शेती झाली बिनभरवशाची : सालगडी महागले, मजुरांचेही भाव वधारलेवणी : कृषिप्रधान समजल्या जाणाऱ्या देशात आता शेतकरीच पराधीन झाले असून शेती व्यवसाय बिनभरवशाचा बनला आहे. शेती उत्पादनाचा वाढता खर्च, पावसाचे बिघडलेले तापमान आणि शेतमालाला मिळणारा अत्यंत कमी भाव, यामुळे हा व्यवसाय सदोदीत नुकसानीचा ठरत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. त्यामुळे बहुतेक सधन शेतकरीसुद्धा आता शेती ठेक्याने देण्याचा विचार करीत आहे. ज्यांना शेती करण्याशिवाय पर्यायच नाही व घरचे चार जण शेतीत राबू शकतात, असे शेतकरी शेती ठेक्याने करून परंपरागत व्यवसाय जोपासण्याचा प्रयत्न करीत आहे.देशातील ९० टक्के ग्रामीण जनता शेती व्यवसायाशी निगडित आहे. मात्र विदर्भातील ८३ टक्के शेती कोरडवाहू असल्याने शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते. बहुतांश शेतकऱ्यांना दरवर्षी संस्थांकडून किंवा बँकांकडून शेती कर्ज घेऊनच शेती कसावी लागते. शेतकऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत कर्जाची परतफेड करण्याच्या अटीवर शासन शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज देते. तरीही शेतातील लागवडीचा खर्च व उत्पादनातून येणारा पैसा, याचा ताळेबंद तोट्याचाच होतो. त्यामुळे अनेक शेतकरी कर्जाचे मुद्दलही भरू शकत नाही. एकदा कर्ज थकले की ते दरवर्षी शेतकऱ्यांच्या डोक्यावर भार बनून राहते. आता तर माणसोमाणसी शेती करणे म्हणजे जुगार खेळल्यासारखेच बनले आहे. सालदाराचे वर्षाचे वेतन एक लाखाचेवर पोहोचले आहे. शेतीसाठी आवश्यक बैलजोडीच्या किंमतीही लाखावर पोहोचल्या आहे. शेतीत राबणाऱ्या मजुरांची टंचाई होत असल्याने मजुरीचे दरही शेतकऱ्यांच्या अवाक्याबाहेर गेले आहेत. बियाणे, खते, कीटकनाशके, तणनाशके यांच्या किंमती शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणाऱ्या ठरल्या आहेत. शेतकऱ्यांची नड बघून कृषी केंद्रांचे चालक शेतकऱ्यांना लुबाडून त्यांना कंगाल करण्याच्या बेतात असल्याचेही कित्येकदा शेतकऱ्यांनी अनुभवले आहे. वर्षभर राबराब राबून वर्षाअखेर सर्व खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या हाती नफा शिल्लक राहतच नाही. त्यामुळे शेती ठेक्याने देऊन एक रकमी पैसा हातात पाडून घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.कधीकाळी शेतकऱ्यांकडे गोधन असायचे. त्यापासूनच शेतात राबण्यासाठी बैल तयार व्हायचे. आता चारा-पाण्याची टंचाई, राखणदार गड्याची मजुरी परवडत नसल्याने शेतकऱ्यांकडे गायींची वानवाच दिसते. त्यामुळे बैलजोडी म्हातारी झाल्यास शेतकऱ्यांना नव्याने बैलजोडी खरेदी करावी लागते. सर्वसाधारण शेतकऱ्यांना ही खरेदी शक्यच होत नाही. त्यामुळे नाईलाजाने शेती ठेक्याने द्यावी लागते. काळ एवढा बदलला की, शेतकऱ्यांनाही पॉकेटचे दुध विकत घेऊन चहा बनवावा लागतो. शेतात टाकायला शेणखत नाही. त्यामुळे जमिनीचा कस कमी होत आहे. तो भरून काढण्यासाठी रासायनिक खताचा मारा करावा लागतो. त्यामुळे शेतीचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून कापसाचे भाव वाढलेले नाही. त्यामुळे कापूस पिकासाठी लागवडीचा खर्च अधिक, तर उत्पादन कमी, असा जुगार शेतकरी खेळत आहे. दोन वर्षांपासून सोयाबिनचे पीक शेकऱ्यांना दगा देत आहे. सिंचनाची पुरेशी सोय नसल्याने दुबार पीक घेण्याची किमया शेतकऱ्यांना करता येत नाही. शेतकऱ्यांना पैशासाठी बँकांवर अवलंबून राहावे लागते. शेती करण्यासाठी सालदार व मजुरांवर अवलंबून राहवे लागते. शेतमाल विकण्यासाठी दलाल व व्यापारी यांच्यावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे शेती व्यवसाय पूर्णत: परावलंबी बनला आहे. शेतकऱ्यांपेक्षा आता शेतमजूर सुखी असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसते. त्यामुळे शेती व्यवसाय मोडकळीस तर येणार नाही ना, अशी चिंता शेतकरी व्यक्त करीत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)शेतकऱ्यांच्या मुली म्हणतात, शेतकरी नवरा नकोच शेती व्यवसायामध्ये स्थैर्य उरले नसल्याने आता लग्नाची मुलगी व तिचे पालकसुद्धा जावई म्हणून शेतकरी मुलाला पसंत करीत नाही. चार पैसे अधिक गेले तरी चालतील, परंतु मुलगी सुखात पडावी ही वधुपित्याची ईच्छा असते. शेतकरी बापाने शेतीचे चटके सोसलेले असतात. त्यामुळे जावई चाकरमानी किंवा स्वत:चा व्यवसाय करणारा असावा, अशी बापाची ईच्छा असते. मग तो चपराशी असला तरी हरकत नाही. त्याचे एखादे टपरी दुकान असो, आॅटो चालविणारा असो, पण शेतकरी जावई नको, ही खुद्द शेतकऱ्यांचीही भावना बनली आहे. शेती व्यवसायाचे हरविलेले महात्म्यच याला कारणीभूत ठरत आहे.